भुसावळ – नेपाळमध्ये भाविकांना घेवून जाणारी बस आज सकाळी नदीपात्रात कोसळून झालेल्या अपघातात १४ जणांचा मृत्यू झाला असून यातील काही भाविक हे जळगाव जिल्ह्यातील व भुसावळ तालुक्यातील असल्याची माहिती समोर आली आहे.
या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, नेपाळमध्ये आज शुक्रवार दिनांक २३ रोजी शुक्रवारी दुपारी ११.३० वाजता उत्तर प्रदेश पासिंगच्या एका बसचा भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहे. ही बस (युपी ५३ एफटी ७६२३) या क्रमांकाची होती. ही बस पोखरा येथून काठमांडू येथे जात होती. भरधाव वेगाने धावणारी ही बस तणाहून जिल्ह्यातल्या मार्सयांगडी नदीच्या पात्रात जाऊन पडली. या बसमध्ये ४० प्रवासी स्वार होते. यातील १४ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, इतर अन्य १६ जण गंभीर जखमी झाले असून त्यांना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.बचावकार्यात लष्कर आणि सशस्त्र दलांची मदत घेतली जात आहे.

काही भाविक वरणगाव परिसरातील असल्याची माहिती समोर आलेली आहे. या संदर्भात केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी तातडीने माहिती घेवून मदत कार्य करीत आहे. तर आमदार एकनाथराव खडसे यांनी देखील रक्षाताईंसोबत अपघातातील जखमींची व्हिडीओ कॉलवरून विचारपूस केली. रक्षाताई या नेपाळमधील मदतकार्यावर लक्ष ठेवून असल्याची माहिती त्यांचे स्वीय सहाय्यक तुषार राणे यांनी दिली.
नेपाळमधे झालेल्या दुर्घटनाग्रस्त बसमध्ये ४० भाविक होते..अपघातात १४ भाविक मरण पावले असून त्यात एका बालकाचा समावेश आहे. १६ जण जखमी झाले असून त्यापैकी ५ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे..टूर ऑपरेटर जळगाव जिल्ह्यातील तळवेलचे असून काही प्रवासीही भुसावळ तालुक्यातील तळवेल, आचेगाव, पिंपळगाव वरणगाव परिसरातील असल्याचे समजते
बस गोरखपूरच्या केसरवाणी टूर अँड ट्रॅव्हल्स एजन्सीचीबस गोरखपूरच्या केसरवाणी टूर अँड ट्रॅव्हल्स एजन्सीची असून महाराष्ट्रातील भाविकांनी बस बुक केली होती. दोन बसमधून ११० प्रवाशी नेपाळला प्रयागराज, अयोध्यामार्गे जात होते. यातील एका बसला अपघात झाला आहे. दुसऱ्या बसमध्ये प्रवास करणारे लोक नेपाळमधील मुगलिंग येथे थांबले असून त्यांच्याशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत बसमध्ये प्रवास करणारे बहुतांश प्रवासी महाराष्ट्रातील होते.
बसमधील भाविक जळगाव जिल्ह्यातील
दरम्यान, अपघातग्रस्त बसमधील काही भाविक जळगाव जिल्ह्यातील असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी वृत्ताला दुजोरा दिला आहे. यूपी आणि नेपाळ प्रशासनाशी संपर्क साधला असून १३ प्रवाशांना वाचविण्यात यश आल्याचे त्यांनी सांगितले. अद्याप पूर्ण माहिती प्राप्त झाली नसून काही वेळात संपूर्ण माहिती येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान बस मधील प्रवाश्याची पुढील यादी समोर आली आहे*





