भुसावळ – आधुनिक भारताचे जनक भारतरत्न पंतप्रधान स्व राजीव गांधी यांची जयंती भुसावळात महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमेटी अल्पसंख्यॉक विभाग तर्फे व स्वराजीव गांधी वाचनालयाच्यावतीने दीनांक २० ऑगष्ट रोजी सकाळी ११ वाजता सदभावना दिन म्हणून साजरी केली .

व्यर्थ ना हो बलीदान ….
सकाळी ११वाजता वाचनालयाचे अध्यक्ष व महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमेटी अल्पसंख्यॉक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष मो मुनव्वर खान व शहर अध्यक्ष सलीम गवली जिल्हा उपाध्यक्ष जे बी कोटेचा यांचे हस्ते राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले . यावेळी मुनव्वर खान यानी मनोगत व्यक्त करतांना सागीतले राजीव गांधी यांनी संगणक क्षेत्रात केलेली उल्लेखनीय क्रांती तसेच पंचायत राज सुरू करून 18 वर्षाच्या मुलांना मतदानाचे अधिकार दिले ,यासह अन्य बाबीवर प्रकाशझोत टाकला आज राजीव जीचे स्वप्नपूर्तीची वेळ आली आहे काँग्रेसचे हात बळकट करा म्हणजे भारत सुपर पॉवर होईल असे आवाहनही केले .
कार्यक्रमास सेवादल शहर अध्यक्ष संजय खडसे, शेख हमीद जिला महासचिव अल्पसंख्याक विभाग, प्रदेश सचिव जसपाल सिंह,जानी गवली आदी शहर अध्यक्ष अनवर तडवी,दानीश गवली,असगर भाई शमीम कुरैशी,यास्मीन कुरैशी,सायरा बानो, हमीदा गवली शीला इंदर परदेशी यांचेसह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .



