,भुसावळ –

भुसावळ विधानसभा मतदारसंघ २००९ पासून अनु. जाती राखीव आहे. संविधानाच्या उद्देशानुसार लोकप्रतिनिधी कडून जे कर्तव्य अभिप्रेत आहे. त्यानुसार भुसावळ लोकप्रतिनिधी दलित, अल्पसंख्यॉक उपेक्षित, गरीब लोकांचे काम करण्यास अपयशी ठरले आहेत. तसेत भुसावळ शहर आणि तालुक्यातील जनतेला विशेषतः शेतकरी, विद्यार्थी, महिला अशा कोणत्याही घटकाला न्याय देऊ शकलेले नाहीत.भाजापा चे आमदार सतत 15 वर्ष पासुन निवडून येत आहे व दहा वर्षा पासुन भाजपाच्या हातात सत्ता आहे. तरी सुद्धा भुसावळ करांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळत नाही. बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध नाही. शहरात आणि तालुक्यात करोडो रुपयांची कामे होऊनही निकृष्ट दर्जाची आहेत. त्यामुळे समस्या कायम आहेत.
मतदार संघात आता नवीन आमदाराची मागणी सर्वत्र जनतेतून होत आहे .. राज्य सरकार आणि केंद्रात भाजपची सत्ता असूनही भुसावळ मतदार संघात कोणत्याही प्रकारे रोजगार उपलब्ध होऊ शकला नाही. त्यामुळे मतदार संघात लोकच आता भाजपा ला कंटाळले आहेत. संपूर्ण राज्यात भाजपा ला अपयश येणार आणि महाविकास आघाडी चे सरकार स्थापन होणार आहे. याबद्दल शंका नाही. कारण हे मत सामान्य जनतेचे आहे. !
भुसावळ विधानसभा मतदारसंघ हा विकासापासून वंचित आहे. त्यामुळे मतदार संघातील शेतकरी, तरूण, अल्पसंख्यॉक महिला, मागास, गरीब लोक भारतीय राष्ट्रीय कांग्रेस राहुल गांधी सोबत आहेत आणि महाविकास आघाडी वर विश्वास ठेवून महाराष्ट्र लोक सभा मध्ये कग्रेस नं वन पक्ष आहेत. तसेच महाराष्ट्रातील जनता व भारता ची जनता महाविकास आघाड़ी . विरोधी पक्ष नेता राहुल गांधी यांच्या वर विश्वास व्यक्त करीत आहे. भुसावळ मतदार संघात कग्रेस आधी पासून दमदार आहे. कॉग्रेस चे बाले किल्ला होता. व अनेक वेळा काँग्रेस पक्षाचे उमेदवार निवडून आले आहेत. आता पुन्हा ती वेळ आली आहे.
सामान्य जनतेच्या मनात आहे फक्त भारतीय राष्ट्रीय कांग्रेस
आणी या वेळी भुसावळ विधानसभा सभा साठी काँग्रेसचे इच्छुक ऊमेदवारची गर्दी वाढलेली आहे
महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमेटीने इच्छुक ऊमेदवारांकडुन दहा हजार रुपए चे डिमांड ड्राफ्ट भरून तिकीट मागणी साठी फॉर्म मागितले आहे . भुसावळ विधानसभा मतदारसंघातून अनेक इच्छुकांनी फॉर्म भरले आहे. यात 1) प्रवीण सुरवाडे २)प्रा मनोहर संधानशु ,३) सागर वानखेड़े 4) राजेन्द्र बावसकर रिटायर्ड इंजिनियर दीपनगर,व महीला डॉक्टर अनेक लोक ई
इच्छुक आहेत.व आश्चर्यचकित करणारे उमेदवार सुद्धा काँग्रेसच्या संपर्कात आहे
लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्ष व महाविकास आघाड़ी ताकदीने लढवली. विधानसभा निवडणुकीत सुद्धा मुस्लिम समाज या महाविकास आघाड़ी च्या माध्यमातून काँग्रेस पार्टी ही जागा निवडून येईल असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमेटी अल्पसंख्यॉक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष मो मुनव्वर खान यानी केले आहे.


