भुसावळ -भारताच्या राज्यघटनेच्या अनुच्छेद 102ड नुसार संसदेतील कुठल्याही सदस्याने संसदेत इतर कोणत्याही देशाला समर्थन देणे अवैध आहे. त्यानुसार त्यांची सदस्यत्व रद्द होते. भारतीय संसदेत शपथ घेताना इतर देशांविषयी निष्ठा राखणे हा देश द्रोह आहे. तसेच हा भारताचा सुद्धा अपमान आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की नुकतेच 18 व्या लोकसभेचे निवडणुका झाल्यात आणि त्या निवडणुकीत निवडून आल्या सर्व खासदारांचा शपथविधीचा कार्यक्रम दिल्ली येथील नवीन संसद भवनात सुरू असताना एम आय एम चे भावनगर चे खासदार असदूद्दिन ओवैसी यांनी 18 व्या लोकसभेत शपथ घेताना,’ जय फिलिस्तीन (पॅलेस्टाईन) अशा घोषणा दिल्यात. त्यामुळे हा एक प्रकारे देशद्रोह आहे. त्यामुळे यांच्यावर त्वरित कारवाई न झाल्यास यांचे खासदारकी रद्द न झाल्यास येणाऱ्या कालखंडामध्ये उद्या उठून भविष्यात संसदेमध्ये जय हमास, जय पाकिस्तान ,म्हणण्यास सुद्धा हे कमी करणार नाही. हा एक प्रकारे संविधानाचा सुद्धा आणि देशाचा सुद्धा फार मोठा अपमान आहे . भारतात संसदेच्या पवित्र भवनामध्ये अशा पद्धतीने देशविधातक भारताच्या विरुद्धच्या घोषणा देऊन नागरिकांना भडकववून भारतातअराजकता निर्माण करणारे आहे. त्यामुळे अशा प्रवृत्तींना वेळीच थांबवलं गेलं पाहिजे म्हणून भावनगर चे विद्यमान खासदार असदुद्दीन ओवैसी यांची खासदारकी तत्काळ रद्द करावी व यांना कायमस्वरूपी निवडणूक लढण्यास बंदी करावी तसेच त्यांच्या पक्षाची मान्यता सुद्धा कायमची रद्द करावी.व राष्ट्रनीतीच्या विरोधात चालणाऱ्या त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा सुद्धा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे प्रदेश सचिव शिशिर जावळे यांनी राष्ट्रपती दौपदी मुर्मु यांच्याकडे एका तक्रार अर्जाद्वारे केली आहे.



