भुसावळ – रावेर लोकसभा मतदारसंघात श्रीराम पाटील यांना उमेदवारी मिळाल्यानंतर राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षात नाराजी नाट्य समोर आले असून माजी आमदार संतोष चौधरी यांना उमेदवारी न देता ऐनवेळी पक्षात आलेले श्रीराम पाटील यांना उमेदवारी दिल्याने भुसावळ वरणगाव रावेर यावल या तालुक्यातील राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाच्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहे. दरम्यान उमेदवारी न मिळाल्याने माजी आमदार संतोष चौधरी हे देखील नाराज असून संतोष चौधरी हे अपक्ष उमेदवारी दाखल करून बंड करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

रावेर लोकसभा मतदार संघात माजी आमदार संतोष चौधरी यांना उमेदवारी न मिळाल्याने राष्ट्रवादी पक्षात तीव्र नाराजी पसरली असून भुसावळ येथील राष्ट्रवादी पक्षाचे शेकडो पदाधिकारी कार्यकर्ते यांनी आपले राजीनामे देऊन आदरणीय शरद पवार यांना अनाहुत पत्र लिहून प्रश्न विचारले आहेत
या पत्रात नमूद आहे की आज मोठ्या हिमतीने तुम्हाला हा छोटासा कार्यकर्ता प्रश्न विचारू इच्छितो आहे की साहेब आपल्या पक्षात खरच निष्ठेला किंमत आहे का..? होय साहेब कारण आज परिस्थितीच तशी निर्माण केली गेली आहे, रावेर लोकसभा मतदार संघात श्रीराम दयाराम पाटील या महिना भरात ३ वेळा पक्ष बदलणाऱ्या, एक ही निवडणूक न लढणाऱ्या, पक्षासाठीच काय तर लोकांसाठी देखिल शुन्य योगदान असणाऱ्या "डमी उमेदवाराला" उमेदवारी देऊन. पडत्याकाळात पक्षाची धुरा व कार्यकर्ते सांभाळणाऱ्या, जिल्हा भरात एक वेगळ वलय असणाऱ्या व पक्षा साठी कोणाशीही टोकाचा विरोध पत्करणाऱ्या, “रावेर लोकसभा मतदार संघात ज्यांच्या कडे एक आशेचा किरण म्हणुन पाहिलं जात होत” अशा आमदार संतोष चौधरी आणि पक्षवाढी साठी रक्ताच पाणी करणाऱ्या ॲड.रविंद्र भैय्यासाहेब पाटील यांना उमेदवारी नाकारून तुम्ही आज आम्हाला हा प्रश्न विचारायला भाग पाडलं साहेब..
देशभराच्या राजकारणात निष्ठेचा बाजार मांडला असताना देखील आम्ही जवळपास ३० वर्षांपासून आपल्या विचारांशी एकनिष्ठ राहिलो, पक्षावर अनेक संकटे आली परंतु आम्ही तळागाळात पक्ष वाढवला, टिकवुन ठेवला आणि "निष्ठेला महत्त्व असतेच" या गोड गैर समजात आपल्या प्रत्येक भूमिकेचं समर्थन करत गेलो पण साहेब आज त्याच निष्ठेच्या बाजारात दुकान लाऊन कोणी निष्ठेला किंमत देते का.. किंमत.. हे ओरडायची वेळ आज आमच्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांवर आली आहे.
साहेब जर आमच्या सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना खरंच पक्षात किंमत असेल तर रावेर लोकसभेसाठी पडत्याकाळात पक्षाची धुरा व हजारो कार्यकर्ते सांभाळणाऱ्या आमदार संतोष चौधरी यांनी पक्षवाढी साठी रक्ताचे पाणी केले आहे. त्यांना उमेदवारी द्यावी अन्यथा भुसावळसह यावल, रावेर, मुक्ताईनगर , वरणगाव, बोदवड , जामनेर येथील शेकडो राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या पदाचा राजिनामा दिला असूनहे राजीनामा पत्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील , जिल्हाध्यक्ष राजेंद्र चौधरी,यांचेकडे व्हाट्सअपद्वारे पाठविण्यात आले आहे सदर राजीनामे मंजुर करावे .अशी एकमुखी मागणीही यावेळी करण्यात आली तसेच लवकरच 15 एप्रिल पूर्वी कार्यकर्त्यांची बैठक घेऊन अपक्ष निवडणूक लढविणार असल्याची घोषणा करण्यात येणार असल्याचेही आयोजित पत्रकार परिषदेत सांगण्यात आले . यावेळी उल्हास पगारे , दुर्गेश ठाकूर , युवराज पाटील , राहुल बोरसे , सचिन पाटील , बाळा सोनवणे ,अशोक चौधरी (आऊ ) यांचेसह कार्यकर्ते उपस्थित होते .
उल्हास पगारे , नितीन सपकाळे, रेखा जाधव , बाळा सोनवणे , देवेंद्र सपकाळे , राजेंद्र चौधरी, प्रतिभा तावडे , गौतम सांळुके , गोकुळ राजपूत , विशाल ढाके , संगीता भामरे , सचिन पाटील , दिपक मराठे,प्रशांत काकडे आदी सह शेकडो कार्यकर्त्यानी राजीनामे दिले


