मतदान केंद्र परिसरात उष्माघात कक्षासह मतदारांसाठी सावली व थंड पाण्याच्या व्यवस्थेसह वेळ वाढवून मिळावा – शिशिर जावळे यांची निवडणूक आयोगाकडे मागणी :

भुसावळमतदान केंद्र परिसरात उष्मा घात कक्षासह मतदारांसाठी सावलीची थंड पाण्याच्या व्यवस्थेसह वेळ वाढवून मिळावा अशी मागणी शिशिर जावळे.यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे . .

उन्हाळ्यामध्ये महाराष्ट्रातील उत्तर महाराष्ट्र सह विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रात सर्वात तीव्र तापमान असत त्यातल्या प्रत्येक उन्हाळ्यात राज्यातील सर्वाधिक उष्णता व तापमानाची नोंद असणार एकमेव शहर म्हणजे भुसावळ .नुकताच गेल्या मार्च महिन्यापासून सुरू झालेल्या तीव्र उन्हाळ्यामध्ये भुसावळ शहर हे राज्यातील सर्वाधिक तापमान असलेले शहर ठरलेला असून. यंदाचा उन्हाळा अतिशय तीव्र असल्यामुळे नागरिकांची त्राही त्राही होत असताना आपण बघत आहे. आणि अशातच महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे. महाराष्ट्रात सुद्धा 19 एप्रिल ते २० मे २०२४ पर्यंत वेगवेगळ्या टप्प्यामध्ये लोकसभा निवडणुका होणार आहेत. आणि अशा वेळी ऐन उन्हाळ्यात लोकसभा निवडणूक आल्यामुळे मतदारांना घराचे बाहेर एवढ्या तीव्र तापमानामध्ये मतदानासाठी निघताना दमछाक होणार आहे. आणि त्यामुळे मतदारांना उन्हाचा फटका बसण्याची दाट शक्यता असल्यामुळे महाराष्ट्रातील भुसावळ सह रावेर लोकसभा मतदारसंघ तसेच इतर सर्व लोकसभा मतदारसंघात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये सर्वच मतदान केंद्रांवर त्वरित मतदारांसाठी उष्माघात पक्ष थंड पिण्याचे पाण्याची व्यवस्था तसेच मतदान केंद्र परिसरामध्ये टेन्टची व्यवस्था करण्यात यावी. उष्णतेच्या पासून बचाव करण्यासाठी मतदारांना ही व्यवस्था करून देणे अत्यंत आवश्यक आहे . तसेच वाढत्या तापमान लक्षात घेऊन मतदानाची वेळ ही सकाळी 6.30ते सायंकाळी 7वाजेपर्यंत वाढवून मिळावी. एकीकडे करोडो रुपये खर्च करुन शासन मतदार जागृती अभियानाच्या माध्यमातुन मतदानाचा टक्का वाढवण्याचा प्रयत्न करीत आहेत . मात्र उष्माघातापासून बचावासाठी मतदान केंद्रावर व्यवस्था उपलब्ध न झाल्यास लोकसभा निवडणूकित मतदार मतदानासाठी एवढ्या अतिशय तीव्र तापमानामध्ये घराबाहेर निघणार नाहीत. त्यामुळे याचा परिणाम मतदानावर होऊ शकतो आणि मतदानाचा टक्का कमी होऊ शकतो ,म्हणून महाराष्ट्रामध्ये भुसावळ शहरासह रावेर लोकसभा मतदार संघ व इतर सर्व लोकसभा मतदारसंघातील मतदान केंद्रावर त्वरित मतदारांच्या उष्माघातापासून रक्षण करण्यासाठी व मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी वरील विविध उपायोजना सूचनांची त्वरित दखल घेऊन त्याबाबत योग्य कारवाई करण्यात यावी अशा आशयाचे पत्र भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे प्रदेश सचिव शिशिर जावळे यांनी केंद्रीय निवडणूक आयोग तसेच महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविले असल्याच त्यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.