भुसावळ
आज प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांनी आगे कूच केलेली आहे. प्रत्येक क्षेत्रातील स्वतःचे अस्तित्व व ओळख निर्माण केली आहे. पूर्वीचा काळ व आता 21 व्या शतकात अमुलाग्र बदल झाले आहेत. स्त्री व पुरुष यांच्यात समानते सोबतच साहचर्याची भावना असली पाहिजे. यामुळे विभक्त होणारे कुटुंब एकत्रित नांदू शकत असल्याचे प्रतिपादन के नारखेडे विद्यालयातील शिक्षिका नलिनी बाविस्कर वानखेडे यांनी केले.
भुसावळ आगारात राष्ट्रीय महिला दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला आगार प्रमुख राकेश शिवदे, भुसावळ स्थानक प्रमुख पी बी भोई, सहाय्यक कार्यशाळा प्रमुख सागर देवकर, एपीजे अब्दुल कलाम नॅशनल कौन्सिल ऑफ यंग सायंटिस्ट च व्हॉइस चेअरमन सुनील वानखेडे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला आगारातील चालक वाहक व यांत्रिकी कामगार महिला यांचा सन्मान पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यानंतर बोलताना नलिनी बाविस्कर वानखेडे म्हणाले की गतकाळाचा विचार केल्यास चूल मूल व घर या पर्यंत मर्यादित असलेली महिला आता अंतराळापर्यंत जाऊन पोहोचलेली आहे. या प्रगतीमध्ये पुरुषांची देखील साथ आहे. यामुळे महिलांनी देखील मिळणाऱ्या अधिकारांचा दुरुपयोग न करता समाजातील संस्कृती व कौटुंबिक वातावरण टिकवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली पाहिजे. पुरुषांनी देखील महिलांना मदत केली पाहिजे. आज राष्ट्रीय महिला दिन साजरा करत असताना आपण येणाऱ्या 21 व्या शतकातील आव्हानांचा विचार केला पाहिजे. व पाश्चात संस्कृतीला नकारात भारतीय संस्कृतीचा स्वीकार केला पाहिजे.
अध्यक्षीय भाषणात राकेश शिवदे म्हणाले की, आज आगारात महिला देखील पुरुषांच्या बरोबरीने काम करीत आहे. चालक वाहक एवढ्यावरच नव्हे तर बसचे दुरुस्तीचे यांत्रिकी काम महिला करत आहे. यामुळे महिला पुरुष यांच्यात समानता राखलीच पाहिजे. त्यांचा सन्मान आपण ठेवला पाहिजे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार कामगार प्रतिनिधी धर्मराज देवकर यांनी केले





