पाणी पुरवठा करणारा जॅकवेल उघडा पडल्याने वरणगाव शहराच्या पाणी पुरवठ्यावर परिणाम : आर्वतन सोडण्याची मागणी

वरणगाव – तापी नदीच्या काठावर तपत कठोरा येथुन शहराला पाणीपुरवठा करणारा जॅकवेल उघडा पडल्याने शहराच्या पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला असुन पंधरा दिवसा पासून पाणी पुरवठा ठप्प असल्याने हतनूर धरणातून अवर्तन सोडण्याची मागणी सुनिल काळे यांनी केली आहे

शहराचा मागील पंधरा दिवसा पासून पाणी पुरवठा ठप्प झाल्याने नागरिकाची पाण्यासाठी नगर परिषदेत ओरड होती मात्र तपत कठोरा येथील तापी नदीच्या काठावर असलेल्या जॅकवेल विहीरी जवळील पाण्याची पातळी कमी झाल्याने पाईप उघडा पडला असल्याने मागील तेरा ते पंधरा दिवसा पासून नागरिकाना पाण्यासाठी भटकंती वेळ आली आल्याने पाणी पुरवठा का होत नाही अशी ओरड घेऊन नागरिक नगर परिषदेत धडक देत जाब विचारण्यासाठी गेल्याने पाणी पुरवठा अभियंता यांनी जॅकवेल जवळील विहिरीचा पाईप नदीतील पाण्याची पातळी कमी झाल्याने पाणी पुरवठा होत नसल्याची दिल्याने भाजपाचे सुनिल काळे यांनी तपत कठोरा येथे जाऊन प्रत्यक्ष पाहणी करीत जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधुन शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी तातडीने उपय योजना करण्याच्या सुचना पाठबंधारे दिल्या मात्र नागरिकाचे पाणी साठी भंटकती होऊ नये यासाठी पाठबंधारे विभागाला हतनूर धरणातून अवर्तन सोडण्याची मागणी केली आहे