भालोद – “सोशल मीडियामुळे तरुणाईला अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळाले, सोशल मीडियामुळे तरुणाईच्या अभिव्यक्तीला चालना मिळाली आणि यामुळे तरुणाई मध्ये आत्मविश्वास निर्माण होण्यास मोठी मदत झाली . व्यक्तीच्या व्यक्तिमत्व विकासासाठी व्यक्त होणे खूप गरजेचं असतं. ध्रुव राठी या 21 वर्षीय तरुणाने स्वतःचे युट्युब चॅनेल सुरू केले आणि त्या चॅनलच्या माध्यमातून तो चालू घडामोडींवर विश्लेषणात्मक व्हिडिओ तयार करू लागला. त्याच्या या व्हिडिओला अल्पावधीतच खूप चांगला प्रतिसाद लाभला त्याचे सध्या 2.5 मिलियन एवढे सबस्क्राईब आहे. मैथिली ठाकूर ही तरुण गायिका सोशल मीडियामुळे प्रसिद्धीस आली, यु ट्यूब , फेसबुक , व्हाट्सअप या माध्यमातून तिच्या गाण्याचे व्हिडिओ व्हायरल झाले.”
असे प्रतिपादन कला व विज्ञान महाविद्यालय भालोद येथील राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. सुनील नेवे यांनी केले . कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव विद्यार्थी विकास विभाग आणि सेकंडरी एज्युकेशन सोसायटी संचलित कला व विज्ञान महाविद्यालय भालोद यांच्या संयुक्त विद्यमानाने विद्यार्थी विकास विभाग व युवती सभा आयोजित सहा दिवसीय आत्मनिर्भर युवती अभियान या अंतर्गत आयोजित सोशल मीडिया आणि आपण या विषयावर प्रा. डॉ. नेवे बोलत होते. या प्रसंगी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर कोल्हे ,युवती सभाप्रमुख डॉ मोहिनी तायडे ,विद्यार्थी विकास विभाग प्रमुख डॉ. दिनेश पाटील सदस्य डॉ. गणेश चौधरी उपस्थित होते.
प्रा डॉ. सुनील नेवे यांनी पुढे असे प्रतिपादन केले की , भारताच्या एकूण 140 करोड लोकसंख्येपैकी 46 करोड लोक सोशल मीडियाचा वापर करीत आहे. महाराष्ट्रामध्ये 12.5 करोड लोकसंख्या आहे आणि त्यापैकी मोबाईल वापरणारे 7 करोड लोक आहेत . सोशल मीडिया हा तरुणाईच्या दैनंदिन जीवनातील अविभाज्य भाग बनला आहे. फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम व्हाट्सअप यूट्यूब अशा माध्यमांचा वापर करण्यात आजची तरुण पिढी अग्रेसर आहे. एका सर्वेक्षणानुसार केवळ 11.3% भारतीय महिला पेमेंट साठी स्मार्टफोन वापरत आहे ,केवळ 6.1% महिला गेमिंग ॲप्स वर सक्रिय आहेत ,23.5% महिला फूड ऍप्स वर आहेत . कम्युनिकेशन ॲप्स 23.3% महिला वापरतात आणि व्हिडिओ ॲप्स मध्ये 21.7% महिलांचा सहभाग आहे . समाजात जसा जातीय संघर्ष दिसून येतो तसा तो सोशल मीडियावर देखील दिसून येतो, समाजात जसा तरुणींचा लैंगिक छळ केला जातो तसा तो सोशल मीडियावर देखील केला जातो ,अस्शीलमेसेज सेंड करून तरुणींना त्रास दिला जातो, विनाकारण चे मेसेज केले जातात ..घरातून मुलीने पळून जाणे लग्न झाल्यानंतर अवघ्या काही दिवसात घटस्फोट होणे इत्यादी प्रकार वाढताना दिसून येतात . याउलट सोशल मीडियाचा वापर करून अनेक आदिवासी समाजातील मुली स्पर्धात्मक परीक्षा पास झाल्या आणि उच्च पदांवर पोहोचल्या ही गोष्ट आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाची आहे. मुंबईच्या पंचवीस वर्षे अमृता माने या या तरुणीने सोशल मीडियाचा वापर करत महिलांना आत्मनिर्भर बनवले आहे . अमृताने यासाठी वुमन ऑन व्हील या संकल्पनेतून आज पर्यंत पंधराशे महिलांना आत्मनिर्भर बनवले आहे .
महाविद्यालयातील माजी विद्यार्थिनी वर्षा चोपडे इंगळे या मुलीने स्वतःचा व्यवसाय सुरू केला आणि आज 36 हजार महिलांना तिच्यामुळे रोजगार मिळाला . लाखो रुपये उत्पन्न ती एका वर्षात मिळवू लागली . तसेच ज्योती भारंबे बोंडे या माजी विद्यार्थिनीने मुंबईमध्ये स्वतःचा गृह उद्योग सुरू केला , कोचिंग क्लास सांभाळून हा गृह उद्योग तिने सुरू केला . आज तिच्याकडे 15 कामगार आहेत की ज्यांना रोजगार प्राप्त झाला या मुलींनी केलेल्या व्यावसायिक प्रगतीमध्ये सोशल मीडियाचा खूप मोठा प्रभाव होता हे त्यांनी आपल्या निवेदनातून स्पष्ट केले . या मुलींची ऑडिओ क्लिप उपस्थित विद्यार्थ्यांना दाखवण्यात आली. याप्रसंगी महाविद्यालयातील डॉ. मीनाक्षी वाघुळदे ,प्रा . शैलजा इंगळे, प्रा. फालगुनी राणे,प्रा. योगिता चौधरी ,प्रा. गीतांजली चौधरी ,प्रा. भावना प्रजापती ,प्रा. कोमल सावळे इत्यादी प्राध्यापक व मोठ्या संख्येने विद्यार्थिनी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु निवेदिका कोळंबे ,तर आभार प्रदर्शन कू . यामिनी भालेराव हिने केले








