भुसावळ : येथिल जामनेर रोडवरील श्री गजानन महाराज देवस्थान तर्फे आज दि.३ रोजी श्री संत गजानन महाराज यांच्या १४६ व्या प्रगट दिनानिमित्त सामूहिक पारायणासह विविध कार्यक्रमांचे आयाेजन केले आहे.
प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही प्रगटदिनानिमित्त प्रारंभी श्रींचे स्नान अभिषेक पूजा स.५:३०. ते ७:३०, सामूहिक पारायण स.६ वाजेपासून तसेच महाप्रसाद वाटप स. ९ ते रात्री ९:३० वाजेपर्यंत करण्यात येणार आहे. तरी भाविकांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, तसेच ज्या भाविकांना महाप्रसादासाठी काही साहित्य अथवा देणगी द्यावयाची असेल त्यांनी जामनेर रोड वरील गजानन महाराज मंदिरात विश्वस्तांशी संपर्क साधावा,असे आवाहन केले आहे.



