भुसावळ –
भुसावळ कला, विज्ञान आणि पु.ओं.नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात मराठी विभाग आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त दिनांक२३ व २४ जानेवारी रोजी मराठी अंताक्षरी, मराठी उखाणे, प्रश्नमंजूषा, सुंदर हस्ताक्षर, पुस्तक परीक्षण, समीक्षण, रसग्रहण अशा विविध स्पर्धा व कार्यक्रम आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाचे उदघाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. व्ही. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एस. व्ही . पाटील, उपप्राचार्य डॉ. बी. एच. बऱ्हाटे, उपप्राचार्य डॉ. ए. डी . गोस्वामी, प्रा. डॉ. जे.एफ.पाटील, प्रा. डॉ. के. के . अहिरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख डॉ. जे.एफ. पाटील यांनी केले. मराठी भाषेचे संवर्धन व महती सांगितली, अलिकडे वाचनाची आवड कमी होत चालली आहे. मराठी भाषा अवगत असणारा विद्यार्थी कुठेही गेला तरी उपाशी राहणार नाही असे प्रास्ताविकात सांगितले.
अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ.एस.व्ही. पाटील यांनी भाषा संवर्धन ही काळाची गरज आहे,कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ज्ञान मिळते म्हणून विद्यार्थ्यांनी विविध कार्यक्रमात जास्तीत जास्त सहभाग घ्यावा असे सांगितले.
दिनांक. २३/०१/२०२४ रोजी प्रथम सत्रात मराठी गाण्यांवर आधारित अंताक्षरी व मराठी उखाणे स्पर्धा घेण्यात आली, विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव मिळावा व त्यातुन भाषेचे संवर्धन केले जावे यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. मराठी अंताक्षरी स्पर्धेत पंधरा विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांचे पाच गट करण्यात आले व मराठी गाण्यांच्या विविध फेऱ्या घेण्यात आल्या. प्रथम क्रमांक मोगरा, व्दितीय क्रमांक जास्वंद, तृतीय क्रमांक गुलाब या तीन विजेत्या गटांना बक्षीस देण्यात आले.या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून डॉ. निनु झोपे, प्रा .संगिता भिरुड, प्रा. नेहा महाजन यांनी काम सांभाळले.
व्दितीय सत्रात या कार्यक्रमा अंतर्गत दुसरी स्पर्धा मराठी भाषेतील उखाण्यांची घेण्यात आली . विद्यार्थ्यांनी सण-उत्सवातील गंमतीशीर उखाणे सादर केले. या स्पर्धेमधून महाराष्ट्रातील उखाण्यांची परंपरा त्यांना कळली. यात अनुक्रमे प्रथम कु . दिव्या पाटील, द्वितीय कल्पेश ठोसर, तृतीय कु. रिना बाविस्कर या विद्याथ्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आले. या स्पर्धेचे परिक्षक म्हणून प्रा. अक्षरा साबळे, प्रा . नेहा महाजन यांनी काम केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा. डॉ. पुरुषोत्तम महाजन यांनी तर आभार प्रा . गौतम भालेराव यांनी मानले.
दिनांक २४/०१/२०२४ रोजी प्रश्नमंजूषा स्पर्धा घेण्यात आली.विद्यार्थ्यांचे सामान्य ज्ञान तपासण्यासाठी साहित्य, संस्कृती, कला यावर आधारित होती, प्रश्नमंजुषा स्पर्धेसाठी पाच गट करण्यात आले. तीन गटांना प्रथम क्र. जास्वंद ,व्दितीय क्र.पुर्णा, तृतीय क्र . वाघूर या विजेत्या गटांना बक्षीसे देण्यात आली. यानंतर सुंदर हस्ताक्षर स्पर्धा घेण्यात आली. संगणकाच्या युगात मुलांमध्ये हस्तलेखनाची आवड निर्माण व्हावी म्हणून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.यामध्ये एकूण पंचवीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला यामधून देखील तीन बक्षीसे देण्यात आली. परीक्षण म्हणून प्रा. डॉ. स्वाती महाजन, प्रा वंदना महाजन यांनी काम सांभळले, या स्पर्धेचे सूत्रसंचालन प्रा डॉ. पुरुषोत्तम महाजन यांनी केले.
दिनांक २५/०१/२४ रोजी पुस्तक परीक्षण, समीक्षण, रसग्रहण स्पर्धा घेण्यात आली.विद्यार्थ्यांना वाचन, समीक्षण, रसग्रहणाची आवड निर्माण व्हावी यासाठी स्पधेचे आयोजन करण्यात आले. यात सत्तावीस विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. यातील प्रथम तीन विद्यार्थ्यांना बक्षीसे देण्यात आली.
कार्यक्रमास महाविद्यालयातील प्रा. डॉ. दिनानाथ पाठक, प्रा . डॉ. एस टी. धूम, प्रा.डी.एन. पाटील, प्रा. डॉ. आर. एस . नाडेकर, प्रा . डी.एम. टेकाडे, प्रा . डॉ. पी .ए. अहिरे, प्रा . एस. के.राठोड, प्रा. डॉ. स्मीता चौधरी, प्रा डॉ. जितेंद्र आडोकार, प्रा. अदनान शेख, प्रा.डॉ. सचिन राजपूत, प्रा. शितल सोनवणे, प्रा. शिवानी माळी, प्रा. कविता पांडव, प्रा. शलाका निकम उपस्थित होत्या. महाविद्यालयातील बहुसंख्य प्राध्यापक आणि विद्यार्थी कार्यक्रमास उपस्थित होते.



