भुसावळ – राजमाता जिजाऊ यांना जाणुन घ्यायचं असेल तर शिवचरित्र वाचावं, मॉसाहेब जिजाऊनीं रामायण, महाभारत यांचा अभ्यास केला. हिंदु धर्म स्वतः जगा व इतरांनी जगु द्या याची शिकवण देतो हेच लक्षात घेवून राजमाता जिजाऊनीं त्याकाळी मोगलांकडून शेतकरी, महिला, आम जनता यांच्यावर होणारा अत्याचार पाहिला होता म्हणुनच अन्याया विरुध्द व स्वराज्य मिळविण्यासाठी शिवबाला लहानपणापासून तसं शिक्षण दिलं व स्वराज्याचे संस्थापक घडवले असे पुंडलीक बर्हाटे शाळेत आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्त्या राजेश्री देशमुख यांनी म्हटले
राजमाता मॉसाहेब जिजाऊ, स्वामी विवेकानंद व देवी सरस्वती यांच्या प्रतिमा पुजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राथमिक विदयामंदिराच्या मुख्याध्यापिका सौ. हेमांगीनी चौधरी या होत्या.प्रमुख पाहुणे म्हणून मराठा महिला मंडळाच्या कार्यकर्त्या ॲड.जास्वंदी भंडारी(पाटील) तसेच प्रमुख वक्ते म्हणून सौ.लताताई साळुंके, राजश्रीताई देशमुख उपस्थित होत्या. मान्यवरांचे पुष्पगुच्छ देवून विद्यालयाच्या वतीने स्वागत करण्यात आले.प्रथम विदयालयातील इ.८वी ते १०वीच्या मुला -मुलीची समयोचित भाषणे झाली.मॉसाहेब जिजाऊ , छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद असे महान पुण्य आत्मे विशिष्ट कार्य करण्यासाठीच पृथ्वीवर येत असतात, स्वतःही सन्मानाने जगा व इतरांनाही सन्मानाने जगू द्या व सशक्त भारत बनण्यासाठी युवकांनी स्वामी विवेकानंद यांचे विचार आचरणात आणावे. असे प्रतिपादन यावेळी ॲड.जास्वंदी भंडारी यांनी केले . तसेच सौ.लताताई साळुंके यांनी राजमाता जिजाऊ या युद्ध शास्त्र,स्थापत्य शास्र, अर्थशास्त्र , शिक्षणशास्त्र, न्यायनिवाडा यात पारंगत होत्या यांचे दाखले देत त्यांच्या लढाऊ व्यक्तिमत्वाबद्दल , त्यांच्या धाडसांबद्दलच्या काही घटनांवर प्रकाश टाकला . कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठा महिला मंडळाच्या कार्यकर्त्या सौ महानंदा पाटील यांनी केले. सुत्रसंचलन श्रीमती. जयश्री चौधरी यांनी तर आभार श्री.दीपक तायडे यांनी मानले.यावेळी सुरेखा पाटील, उज्वला चौधरी,समीर तडवी, प्रदीप परखड, सुनिता बर्हाटे, ममता फालक व विद्यार्थी उपस्थित होते





