ग्रामीण भागातील प्रवासी एसटी सवलत योजने पासून वंचित.बस आगार प्रमुख जबाबदार – शिशिर जावळे यांचा आरोप : मुख्यमंत्र्यांकडे केली तक्रार


भुसावळ – महाराष्ट्र शासनाने शालेय विद्यार्थ्यांपासून ,महिला ,ज्येष्ठ नागरिकांसाठी यातील काहीना 100% मोफत प्रवास, काहींना 50% प्रवास सवलत , यासह विविध सवलती योजना जाहीर केल्या असून त्या योजनांची अंमलबजावणी संपूर्ण राज्यात करण्याची आदेश माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी दिलेले असून या प्रवाशांसाठीच्या विविध सवलतीच्या योजनांची अंमलबजावणी संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू आहे . असे असताना भुसावळ जिल्हा जळगाव महाराष्ट्रातील ,महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या भुसावळ बस डेपो व्यवस्थापक हे जाणून-बुजून शासन दरबारी परिवहन महामंडळाकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे शाबासकी मिळावी म्हणून स्वतःची वाह वाह व्हावी म्हणून त्यांच्या सेवेमध्ये अति उत्कृष्ट शेरा लागावा एक इन्क्रिमेंट वाढ व्हावी व त्यांचे शासनाकडून कौतुक व्हावे या स्वार्थापोटी भुसावळ तालुक्यातील ग्रामीण भागात दर रविवारी बसेस फेऱ्या रद्द करून त्या बसेस रावेर बस डेपो कडे रावेर पुणे जास्तीच्या बस फेऱ्या वाढाव्यात म्हणुन त्या डेपो ला नफा प्राप्त व्हावा यासाठी भुसावळ बस आगाराचे व्यवस्थापक यांनी अशा पद्धतीने अधिकारांचा वापर करून भुसावळ ग्रामीण भागातील जनतेला प्रवाशांना सदर प्रवासाच्या सवलतीच्या योजनांपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. दर रविवारीभुसावळ शहरांमध्ये भला मोठा आठवडे बाजारभरत असतो आणि या दिवशी ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात शेतकरी, महिला , गोरगरीब जनता आठव डे बाजारासाठी येत असतात . आणि नेमकं त्या दिवशी रविवारी भुसावळ बस डेपो आगाराकडून ग्रामीण भागात बसेस फेऱ्या केल्या जात नाहित. त्यामुळे ग्रामीण भागातील जनता प्रवासी यांना भुसावळ शहरात बाजारासाठी येण्यासाठी विविध साधनांच्या माध्यमातून भाड्यासाठी जास्तीचा खर्च करावा लागतो . या आधी आणि ऐन दिवाळीत सुद्धा असाच प्रकार घडलेला आणि अजून देखील सुरू असल्याचा समजत.यामुळे सदर नागरिक जनता शासनाच्या या परिवहन मंडळाच्या विविध प्रवास सवलती आणि योजनांपासून वंचित राहतात.याबाबत आगार व्यवस्थापकांना अनेकदा विचारणा झाली असता याबाबात चुकीची माहिती देतात आणि योग्य असल्याच दर्शवतात. त्यामुळे याची देखील उच्चस्तरीय चौकशी होऊन सदर प्रकार जेव्हा पासून सुरू आहे तेव्हा पासून तर आज पावतो भुसावळ ग्रामीण विभागात रविवारी झालेल्या बसेस फेऱ्या या सर्वांचे सोशल ऑडिट सुद्धा व्हावं. बाबत उच्चस्तरीय चौकशी व्हावी. व नियमित आठवडाभर ग्रामीण भागात ठरलेल्या नियोजनानुसार बस फेऱ्या सुरु ठेवण्यात याव्यात . तसेच आपल्याकडे भुसावळ बस डेपो मध्ये मानव कल्याण च्या निळ्या कलरच्या एसटी सुद्धा लाभार्थींसाठी सुरू करण्यात याव्या अशी मागणी देखील श्री नमो विचार मंत्र साई निर्मल फाउंडेशनचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते शिशिर जावळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , व मुख्य व्यवस्थापक महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ यांच्याकडे केली असल्याचे त्यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविलेले आहे .
.