भुसावळच्या प्रसिद्ध उद्योजिका सुनीता जोशी दिल्ली येथे पार्लमेंट अवॉर्डने सन्मानित :

भुसावळ –
भुसावळ येथील शिवम पोहा फॅक्टरीच्या तथा शिवम फॅन्सी ड्रेस व इमिटेशन ज्वेलरीच्या संचालिका प्रसिद्ध उद्योजिका सौ सुनीता जोशी यांना नुकतेच दिल्ली येथे केंद्रीय अर्थमंत्री यांच्या हस्ते पार्लमेंट अवॉर्डने सन्मानित करण्यात आले .संपुर्ण महाराष्ट्रातून एकमेव कुशल उद्योजिका म्हणून सुनीता जोशी यांची निवड झाली . अल्पावधीतच त्यांच्या कामाची पावती ,केलेले कष्ट , या क्षेत्रात पाय रोवून उभे राहतांना झालेला त्रास ,होणारा मान अपमान सहन करून त्यांनी यशाचे शिखर गाठले.
दिल्ली येथील या सोहळ्यात संपुर्ण भारतभरातून एकूण ५० व्यक्तीची निवड झाली होती यामध्ये भारता बाहेरील २० लोक , यात महाराष्ट्रातून जोशी यांची वर्णी लागली व हा बहुमान मिळाला.
प्रतिष्ठित मानाचा अवॉर्ड मिळाल्याचा सुखद अनुभव व आनंद व्यक्त करतांना सौ जोशी म्हणाल्या की , ८ आक्टोबर मला दिल्लीत पार्लमेंट अवाॅर्ड मिळाले खूप छान वाटले.अवाॅर्ड म्हणजे काय ? तर आपण केलेल्या कामाची पावती.ते इतके छान होते की,केलेले कष्ट,झालेला त्रास, मान अपमान,हे सर्व त्यापुढे शुन्य होते.तिथे संपूर्ण भारतभरातून पन्नास मंडळी आले होते.आणि भारताबाहेरील विस मंडळी होती.दोन दिवस आम्ही सर्व सोबत राहिलोत.विमानाची टिकीटे दिली होती.एअरपोर्टला न्यायला गाडी पाठवली होती.पाच पाच व्यक्ती मिळुन एक गाडी दिली होती.संपुर्ण दिल्ली फिरायला मिळाले रोज दोन तास जमलेल्या मंडळींची मिटिंग असायची.त्यातुन खूप काही शिकायला मिळाले.बाहेर मार्केटिंग कसे करायचे.व्यवसायात नविन काय करायचे,वेळ कसा वाचवायचा,टिम वर्क कसे करावेत,एक दुसऱ्याला कसे साह्य करायचे , यात एका ९० वर्षे वयाच्या व्यक्तींचा अनुभव ऐकण्यासारखा होता.
मराठमोळी पद्धतीने प्रवेशद्वारात औक्षण केले.अजुन खूप काही.अर्थमंत्री सोबत काही सेकंद भेट झाली.प्रत्यकाला दिड मिनिटं बोलण्याची संधी दिली होती.तिथे मराठी माणूस सुद्धा हिंदी बोलला, फक्त मी एकटीच मराठी बोलली.आणि अशी घोषणा मी जय भवानी,जय शिवराय,जय महाराष्ट्र अशी घोषणा यावेळी दिली.
भुसावळच्या नावलौकिकात मानाचा तुरा खोवून अवघ्या महाराष्ट्राचे नाव उंचावलेल्या स्त्री शक्तीला सलाम .
या यशाबद्दल डॉ सुवर्णा गाडेकर , व्हॉइस ऑफ मीडिया तालुकाध्यक्ष पत्रकार उज्वला बागुल , भुसावळ महिला बार असोसिएशन अध्यक्षा अँड जास्वंदी भंडारी, सक्षम नारी संघटना यांचेसह सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत असून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे .