भुसावळ – येथील तुकाराम नगर भागातील रहिवासी तथा रेल्वे कर्मचारी गिरीश शालिग्राम पाटीलयांचा उष्माघाताने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना येथे घडली .

सध्या उष्णतेचां पारा 46 अंश वर गेल्याने लाटेचे भीषण परिणाम सर्वत्र दिसून येत आहे
आज दि १५ मे रोजी रेल्वे कर्मचारी गिरीश शालिग्राम पाटील (वय २८) हे पुण्यावरून आजीचे तेरावे करण्यासाठी आले होते दरम्यान मागील १५ दिवसा पूर्वी त्यांना कन्यारत्न
झाले . म्हणून झेड टी एस येथे गाडगे महाराज मंदिराजवळ मुलीला पाहण्यासाठी ते गेले असता घरी परतल्या नंतर
यांना आज सकाळी उलट्या होऊ लागल्या व पोटात दुखत असल्याने डॉक्टरांकडे नेले. डॉक्टरांनी औषध देऊन त्याला घरी पाठवले, मात्र उलट्या न थांबल्यामुळे दुपारी १२ वाजेच्या सुमारास डॉ. राजेश मानवतकर यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना दुपारी २ वाजता त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी डॉ. मानवतकर यांनी बाजारपेठ पोलिसात माहिती दिली आहे. त्यानुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गिरीश हा शालिक मिठाराम पाटील यांचा लहान मुलगा आहे.ट्रांमा सेंटर येथे त्यांचे पीएम करून १६ में रोजी
सकाळी आठ वाजता तुकाराम नगर येथून त्यांच्या राहत्या घरून अंत्ययात्रा निघणार
आहे…….
*नागरिकांनी आपली काळजी घ्यावी असे प्रशासनातर्फे आवाहन करण्यात येत आहे*.
उष्माघातापासून सुरक्षेसाठी अशी घ्या काळजी
तहान नसल्यासही पुरेसे पाणी प्या.
सौम्य रंगाचे, सैल आणि कॉटनचे कपडे वापरा.
बाहेर जाताना गॉगल्स, छत्री, टोपी, बूट किंवा चप्पल वापरा.
प्रवास करताना सोबत पाण्याची बॉटल घ्यायला विसरू नका.
आपलं घरं थंड ठेवा, पडदे लावा, सनशेड बसवा आणि शक्य असल्यास रात्री खिडक्या उघड्या ठेवा.
उन्हात डोक्यावर छत्री, टोपीचा वापर करा. डोके, गळा, चेहºयासाठी ओल्या कपड्याचा वापर करा.
अशक्तपणा, कमजोरपणा जाणवत असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.
ओआरएस, घरातील लस्सी, तोरणी, लिंबू पाणी किंवा ताक इत्यादी प्या.
थंड पाण्याने आंघोळ करा.
दुपारी १२ ते ३ वाजेदरम्यान उन्हात फिरू नका.
मद्यसेवन, चहा, कॉफी आणि काबोर्नेटेड सॉफ ड्रिंक्स पिणं टाळा, त्यामुळे डिहायड्रेशन होतं.
उच्च प्रथिनयुक्त आहार आणि शिळं अन्न खाऊ नका.


