बोदवड – येथील संताजी महिला मंच यांच्यातर्फे मकर संक्रांतीनंतर दरवर्षी हळद-कुंकू व गुणगौरव सोहळा आयोजित केला जातो. यावर्षीही रविवार दिनांक 22 /1/ 2023 रोजी मुक्ताई मंगल कार्यालय येथे दुपारी तीन वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .आलेल्या प्रत्येक महिलांना तिळगुळ वाटप करण्यात आला . कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष डॉक्टर वृषाली चौधरी यांनी केले आणि संताजी महिला मंचाची निर्मिती ते आजची वाटचाल याविषयी सांगितले. यानंतर समाजाच्या महिला मेहनती आहे परंतु आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे व्यवसाय ज्ञान नाही यासाठी चार सुपर शॉप चे व्यवस्थापन करणारे बोदवड येथील अरिहंत सुपर शॉप चे संचालक श्री निखिल जैन यांची प्रश्नोत्तर रूपात सविता चौधरी व लीना तेली यांनी मुलाखत घेतली. या मुलाखतीत मुलाखत घेणाऱ्यांनी तसेच उपस्थित महिलांनीही श्री निखिल जैन यांना अनेक प्रश्न विचारले व निखिल जैन यांनी व्यवसायाचे अनेक कौशल्य समजावून सांगितले .आपण जरी एखादी वस्तू तयार केली तरी ती विकण्याच्या आधी आपण फूड लायसन काढावे जर आपल्याला फूड लायसन काढावे अडचण येत असली तर त्यासाठी मी सर्वतोपरी मार्गदर्शन करेल. कुरडई ,पापड ,शेवया ,अशा वस्तू आपण तयार करून आमच्याकडे दिल्यास आम्ही त्यांना विकू शकतो. तसेच घरी बसल्या बसल्या शेअर मार्केटचा व्यवसायही आपण करू शकतात आपल्याला काही गृह उद्योग करायचा असल्यास व कर्ज प्रक्रिया करायचे असल्यास त्यासाठी तुम्ही मला केव्हाही बोलवा मी त्यासाठीही आपणास सहकार्य करेल अशी ग्वाही दिल्याने महिलांमध्ये उत्साह संचारला .यानंतर प्रमुख अतिथी शेंदुर्णी येथील प्राध्यापिका डॉक्टर योगिता चौधरी यांनी महिला सक्षमीकरण या विषयावर आपले विचार मांडले. आम्ही सर्व सहा बहिणी आहोत आम्हाला भाऊ नाही तरीही आमचे आई-वडील खूप आनंदी आहे. पण आजच्या काळात अजूनही वंशाचा दिवा हवा यासाठी मोठ्या प्रमाणात भ्रूण हत्या केली जाते हे समाजाचे दुर्दैव आ.हे महिला कुठे बाहेर गेल्या तर त्यांना दहा किंवा वीस रुपयांचं काम पडलं तर पतींना हे पैसे मागावे लागतात तसेच घरात ज्या अनेक प्रकारच्या समस्या किंवा भांडण होतात हे पतींना माहिती नसतात परंतु याला कारण बऱ्याच ठिकाणी महिलाच असतात .यासाठी आपण परिवारात वावरताना सामाजिक सामंजस्याची भूमिका पार पाडली पाहिजे. आपण कोणत्या पदावर आहोत याची चप्पल पती व पत्नी यांनी घराच्या उंबरठ्याच्या बाहेर काढली पाहिजे. घरात मात्र एक आनंददायी वातावरण कसे राहील यासाठी प्रयत्न केले पाहिजे .मी मुलगी असूनही महाविद्यालयात असताना राजस्थान पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये जाऊन क्रिकेट खेळून आलेली आहे .आपणही आपल्या मुलींना भातुकलीच्या खेळाच्या बाहेर काढून बाहेरच्या जगाचा परिचय करून द्यावा. पुरुष फक्त बाहेरचे काम करू शकतात पण महिला मात्र घरातील सर्व काम ,मुलं बाळ सांभाळणे, व बाहेरची ही काम करू शकतात म्हणजे पुरुषांपेक्षा महिलांमध्ये अधिक क्षमता आहे. असे विचार त्यांनी मांडले. तसेच समाजातील दहावी बारावी व पदवी परीक्षेत ज्यांनी विशेष यश संपादन केले अशा गुणवंतांचा ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन प्रमुख अतिथींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची सूत्रसंचालन सौ. ममता चौधरी व प्रीती चौधरी यांनी केले आभार सौ ज्योती तेली व सचिव ललिता तेली यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतीसाठी संताजी महिला मंचच्या सदस्या व समाजातील महिला यांनी परिश्रम घेतले. सर्व उपस्थित महिलांसाठी सौ सविता प्रकाश चौधरी यांनी चहा पाण्याची व्यवस्था स्वतः केली या कार्यक्रमासाठी सौ तेजस्विनी सुभाष चौधरी यांनी हॉल उपलब्ध करून दिला व फोटोग्राफर पंडित वंजारी आणि श्री राजगुरे यांनी अत्यल्प दरात आपली सेवा दिली तसेच संताजी महिला मंच तर्फे वाण म्हणून ट्रे देण्यात आला. अशा या कार्यक्रमासाठी समाजातील सर्व महिला उपस्थित होत्या व कार्यक्रम ऐकून एक नवीन ऊर्जा त्यांना मिळाली. पुढील वर्षी पर्यंत दहा महिला नवीन उद्योग सुरू करतील असा आशावाद व्यक्त करण्यात आला.



