आता ग्रामसेवकांनाही बायोमेट्रिक अन् ते म्हणतात, ‘आमचं काम फिल्डवरच !’ नागरिकांची गैरसोय होणार दूर कामांना मिळणार अधिक :

भुसावळ:- आता ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाऱ्यांची दरवेळी वाट बघत ताटकळत बसण्याची, त्यांना शोधण्यासाठी धावाधाव करण्याची तसेच फोनवर संपर्क साधण्याची गरज नागरिकांना पडणार नाही. त्यांनाही आता बायोमेट्रिक हजेरी प्रणाली लागू करण्याबाबतचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला आहे.

याबाबत भाऊसाहेब म्हणतात की, आमचं काम फिल्डवरच असतं. त्यामुळे कामांसाठी बाहेर फिरावं लागते, बायोमेट्रिकच्या नादात कामे थांबतात. त्यामुळे याबाबत निर्णय घेताना विचार करण्याची गरज आहे. ग्रामीण भागातील गावाच्या विकासाचा कणा समजले जाणारे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी वेळेत उपलब्ध झाल्याने नागरिकांची गैरसोय आगामी काळात टळणार आहे. बायोमेट्रिक हजेरी प्रणालीबाबतचे पत्र शासन स्तरावरून देण्यात आले.

जिल्हा परिषदेकडून अंमलबजावणी होणार

जिल्हा परिषदेच्या माध्यमातून याची अंमलबजावणी होणार आहे. कधीपासून याची सुरुवात होईल. याबाबत अद्याप माहिती मिळाली नाही. बायोमेट्रिक मशीन शासनाकडून मिळणार की, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून बसविण्यात येणार याबाबत निर्णय झालेला नाही.

एकाकडे दोन गावे

ग्रामसेवकांची संख्या कमी असल्यामुळे काही ठिकाणी एका ग्रामसेवकाकडे दोन गावे आहेत. अशा ठिकाणी बायोमेट्रिक प्रणाली सुरू करताना अडचणी येणार आहे. याबाबत प्रशासनाकडे कोणता निर्णय घेण्यात येईल. तसेच ग्रुप ग्रामपंचायत असल्यास एका गावातच बायोमेट्रिक मशीन राहणार का, असे प्रश्न उपस्थित होत आहे.

” बायोमेट्रिक बाबत शासन निर्णय झाल्याचे पत्र जिल्हा परिषद प्राप्त झालेले असल्याचे ऐकवीत आहे परंतु बायोमेट्रिक कशातून खरेदी करावे किंवा शासन पूरविणार किंवा काय याबाबत अद्याप पर्यंत कोणते प्रकारची माहिती नाही ग्रामसेवक ग्रामविकास अधिकाऱ्यांना ग्रामपंचायतीच्या दैनंदिन कामाव्यतिरिक्त तालुक्यावर जिल्ह्यावर वारंवार जावं लागतं वस्तू खरेदी साहित्य खरेदी किंवा कोटेशन व इतर कामांसाठी तसेच पंचायत समितीच्या सभा व इतर कामासाठी बाहेर जावं लागतं काही ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी यांच्याकडे एकापेक्षा जास्त ग्रामपंचायतीचा कार्यभार असल्याने त्यांना नेमके बायोमेट्रिक कुठे करावी किंवा कसे याबाबत कोणतीही माहिती नाही त्यामुळे अडचणी येऊ शकतात परंतु शासनाने निर्णय घेतलेला असेल तर त्याची अंमलबजावणी करणे हे प्रत्येक कर्मचाऱ्यांची कर्तव्य असते त्यामुळे शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी करणे हे आमचेही कर्तव्य राहील व त्याप्रमाणे अंमलबजावणी करण्यात येईल.

-प्रितम शिरतुरे ,
तालुका अध्यक्ष
भुसावळ तालुका ग्रामसेवक संघटना.