वरणगाव | प्रतिनिधी
कोळी समाज बांधवांच्या जिल्हा बैठकीत ८ जानेवारी २०२३ ला वधू – वर परिचय मेळावा तसेच युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे . यामुळे समाज बांधवांनी आपल्या उपवर पाल्यांची लवकर नावे नोंदणी करावी असे आवाहन कोळी समाज विकास मंचच्या माध्यमातून करण्यात आले आहे .
भुसावळ तालुक्यातील वरणगांव महामार्गावर असलेल्या हिरा मारोती मंदिर येथे नुकतीच जिल्हास्तरीय कोळी समाज बांधवांची बैठक संपन्न झाली . बैठकीत कोळी समाज विकास मंच स्थापन करणे, तसेच समाजाच्या प्रगतीसाठी वधू – वर परिचय मेळावा, युवा महोत्सव आणि सामुहीक विवाह सोहळा आयोजन करण्या संदर्भात चर्चा झाली . यामध्ये दिपनगर येथे ८ जानेवारी २०२३ रोजी वधू – वर परिचय मेळावा तसेच युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे . यासाठी सर्व समाज बांधवांनी एकत्र येऊन सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे . बैठकीला यावल, रावेर, भुसावळ, बोदवड, जळगांव आदी भागातील समाज बांधवांची उपस्थिती होती .



