भुसावळ –
पिवळ्या रेशन कार्ड धारकांना म्हणजेच अंत्योदय योजनेतील रेशन कार्ड धारकांना १ किलो तेल,१ किलो रवा,१ किलो चना दाळ,१ किलो साखर असलेले किट १०० रुपयात सरकार देणार आहे याचा लाभ फक्त पिवळ्या रेशन कार्ड धारकांना होणार आहे त्यामुळे केशरी कार्ड धारकांवर शिंदे व फडणवीस सरकार अन्याय करत असल्याचा जनमानसात रोष आहे
आज रोजी महागाई गगनाला भिडली असताना सर्वच सर्वसामान्य जनतेला रेशन किट ची आवशक्याता असताना त्यांना दिवाळी चे किट का नाही? केशरी कार्ड धारक भारतात राहत नाही का? त्यांना मतदानाचा अधिकार नाही आहे का! शिंदे सरकार केशरी कार्ड धरकांवर अन्याय करीत आहे
आम्ही सर्व शिवसेना पदाधिकारी या निवेदनाच्या माध्यमातून सरकारला मागणी करीत आहोत की दिवाळी चे५ _५ कीलीचे किट सरसकट सर्व कार्डधारकांना देण्यात यावे
यावेळी शिवसेना शहर प्रमुख दिपक धांडे,हेमंत खंबाईत, अड कैलाश लोखंडे,योगेश बागुल,राकेश खरारे,स्वप्नील सावळे,पिंटू भोई,अरुण साळुंके,संदीप पाटील,सोनी ठाकूर उपस्थित होते



