भुसावळ : शहरातील समता नगरातील आशिष आलोटकर या तरुणाला डांबून ठेवून मारहाण करण्यात आली होती शिवाय कुटुंबाला ओलिस ठेवण्यात आले होते. या प्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर तिघांना अटक करण्यात आली. न्यायालयाने संशयीतांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.
भुसावळ शहर पोलिसांनी या प्रकरणी पप्या साळवे, आकाश खिल्लारे, सुमित घनघाव यांना अटक केल्यानंतर त्यांना सुरूवातीला सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. कोठडीची मुदत संपल्यानंतर सोमवारी संशयीतांना न्यायालयात हजर केले असता तीनही संशयीताना 7 मे पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. संशयीत पप्या साळवेतर्फे अॅड.वसीम खान तर आरोपी आकाश खिल्लारे व सुमित घनघाव तर्फे अॅड.सत्यनारायण आर.पाल यांनी काम पाहिले. सरकार पक्षातर्फे अॅड.भागवत पाटील यांनी बाजू मांडली. तपास निरीक्षक गजानन पडघण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक संदीप दुनगहू करीत आहेत.



