वरणगाव नगरपरिषदचा ढिसाळ कारभार; पिण्याच्या पाण्यासाठी जनता झाली त्रस्त – न. पा.अधिकाऱ्यांचे नियोजन शुन्य कारभार; शिवसेना शहरप्रमुख संतोष माळी यांनी आंदोलनाचा दिला इशारा

भुसावळ (प्रतिनिधि ) वरणगाव शहरात नागरिकांना बारा ते पंधरा दिवसानंतर पिण्याचे पाणी मिळत आहे. ऐन उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. न. पा. अधिकाऱ्यांचा ढिसाळ कारभार असून कुठल्याही प्रकारचे नियोजन नसल्याचा आरोप शिवसेना शहरप्रमुख संतोष माळी केला असून आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे.

वरणगाव शहरात बारा ते पंधरा दिवसानंतर पिण्याचे पाणी नागरिकांना मिळत आहे. ऐन उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागतेय आहे. बुधवारी वॉर्ड क्रमांक दोन मधील मुस्लिम समाजबांधव हे शिवसेना शहर प्रमुख संतोष माळी यांना भेटून पाण्याची समस्या सांगितली. त्यानंतर संतोष माळी यांनी थेट नगरपालिकेमध्ये जाऊन ओ एस. पंकज सूर्यवंशी यांना फैलावर घेत मुस्लिम समाज बांधवांचा रमजान महिना सुरु आहे. हिंदु बांधवांच्या घरी चैत्राचे कानाचे कार्यक्रम आहे. न.पा.चा ढिसाळ कारभार आणि नियोजन शून्य असल्याने नागरिकांना पिण्याचे पाणी वेळेवर येत नाही आहे. तसेंच काही भागात डबल डबल पाणी पुरवठा केला जातो. या संदर्भात न. पा.चे मुख्याधिकारी समीर शेख यांनाही फोन करून ही समस्या लवकर सोडवा अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलन करण्याचा इशाराही शहरप्रमुख संतोष माळी यांनी दिला आहे.