भुसावळ – आधीच कोरोनाचा कहर व त्याच्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांचा संप या दुहेरी संकटातून आता हळूहळू सावरत भुसावळ आगारतून जाणाऱ्या बसची संख्या वाढत असल्याने प्रवाशांचीही रेलचेल बस स्थानकावर होतांना दिसून येत आहे सद्यस्थितीला भुसावळ आगारातून ७० फेऱ्या सुरू असून कर्मचारी संख्या वाढ झाल्यास शिर्डी,,सुरत व तालुक्यातील गावांच्या फेऱ्या वाढविण्यात येणार असण्याचे संकेत आहे.
जंक्शन शहरामध्ये रेल्वे स्टेशनला लागून असलेल्या बस स्थानक हे प्रवाशांसाठी सोयीचे आहे, लांब पल्ल्याच्या रेल्वे प्रवासात उतरून लगेच प्रवासी बस स्थानकात प्रवेश करतो व आपल्या गावी जाण्यासाठी बस पकडतो मात्र गेल्या दोन वर्षापासून कोरोना मुळे बस सेवा ठप्प होती व त्यानंतर पूर्वपदावर येणारी बस सेवा ही एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे बसचे चक्के जाम झाले होते,आता पुन्हा हळू हळू भुसावळ आगारात कर्मचाऱ्यांची संख्या वाढत असल्यामुळे शहरांतर्गत व लांब पल्ल्याच्या बसेस आगारातून सोडण्यात येत आहे
राज्य शासनातच विलीनीकरणासाठी ८ नोव्हेंबर २०२१ पासून राज्य परिवहन मंडळाचे कर्मचारी संपावर गेले हा संप आजूनही संपूर्णपणे समाप्त झालेला नाही मात्र हळूहळू कर्मचारी कामावर परत येतांनाचे चित्र आहे भुसावळात सद्यस्थितीला ४० वाहक, १५ चालक व ९ खाजगी चालक अशी चालक व वाहकांची संख्या आहे
या मनुष्यबळाच्या मदतीने लाल परीची सेवा पुन्हा रुळावर येत आहे, संप काळापूर्वी भुसावळ आगारातून दररोज ३५० बस फेऱ्या सुटायच्या, बंद झालेल्या फेर्या आता ७० पर्यंत अाल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे, सध्या आगारातून मेहकर, अकोला, नाशिक, औरंगाबाद, धुळे, अमळनेर,जळगाव, रावेर यासह तालुक्यातील बेलव्हाय, सुरवाडा, बोदवड या मार्गावर बस सेवा सुरू आहे.

खाजगी वाहनाकडे जाणारे प्रवाशांचे पाय आता हळूहळू बस स्थानकावर येताना दिसत असून पूर्वीसारखी गर्दीने बस स्थानकामध्ये लगबग होताना दिसून येत आहे. .
संपा पूर्वी ५ लाख तर सद्यस्थितीला २ लाखापर्यंत उत्पन्न
संपापूर्वी भुसावळ आगाराला प्रति दिवस तब्बल ५ ते साडेपाच लाख पर्यंत उत्पन्न मिळत होते, संप काळामध्ये दीड ते दोन लाखांच्या घरात उत्पन्न मिळत आहे ,पूर्वी प्रति दिवस बसेसचा ५२ हजार किमीचा प्रवास भुसावळ होत असे आता १६ हजार किमीचा पल्ला बसेस गाठतात
शिर्डी ,सुरत, कल्याण ,पुणे या मार्गाला प्राधान्य
कर्मचाऱ्यांची संख्या मध्ये वाढ झाल्यास शिर्डी ,सुरत, कल्याण, पुणे, या लांब पल्ल्याच्या मार्गावर तसेच तालुका व जिल्हा अंतर्गत ही बस फेऱ्यांमध्ये मध्ये वाढ होणार आहे.
बस सेवा ठप्प , चा परिणाम सामान्य प्रवाशांना बसला असून खाजगी वाहनाने प्रवास करण्यास वेळ ,पैसा अधिक प्रमाणात वाया जातो, हळूहळू बस संख्या वाढत असल्यामुळे तूर्त दिलासा मिळाला आहे, मात्र कायमस्वरूपी बस सेवा पूर्ववत व्हावी. अशी अपेक्षा मागणी प्रवासी यांनी केली आहे .


