भुसावळ – प्रहार जनशक्ती पक्षाच्या मुंबई येथील प्रदेश कार्यालयात झालेल्या बैठकीत प्रहार कामगार आघाडीच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी केदार सानप यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. ही निवड प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे यांनी राष्ट्रीय अध्यक्ष ना.बच्चु कडू यांच्या मार्गदर्शनाखाली केली. याबाबतचे नियुक्ती पत्र उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष अनिल चौधरी यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष फिरोज रहेमान शेख, शहराध्यक्ष खन्ना कोळी आदी उपस्थित होते. नियुक्तीनंतर केदार सानप यांनी नागरिकांच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय तसेच सर्वांगीण विकासाच्या उद्दिष्टासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. निवडीबद्दल त्यांचे ना.बच्चु कडू, प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे, उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष अनिल चौधरी, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष फिरोज रहेमान शेख, शहराध्यक्ष खन्ना कोळी यांच्यासह प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्वागत केले आहे.



