रेल्वेने मुखपट्टी (मास्क) न घातल्याबद्दल दंड आकारण्याची मुदत वाढवली;

भुसावळ – मागील सहा महिन्यांत मध्य रेल्वेत २०,९१० विनामास्क प्रकरणे आढळली आणि त्यासाठी दंड आकारण्यात आला

रेल्वेगाडीत व रेल्वे परिसरामध्ये मुखपट्टी न घालणाऱ्या सर्व व्यक्तींना ₹ ५००/- दंड लावण्याची वैधता दिनांक. १६.४.२०२२ पर्यंत वाढवण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. कोविड -१९ चा प्रसार रोखण्यासाठी आणि कोविड -१९ नियंत्रित करण्यास मदत करण्यासाठी हा नियम आधीच लागू करण्यात आलेला आहे.

मध्य रेल्वेच्या तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांच्या विशेष पथकांनी दि. १७.४.२०२१ ते ३.१०.२०२१ या कालावधीत मुखपट्टी (मास्क) न घातलेल्या प्रवाशांची २०,९१० प्रकरणे शोधली आणि ३५.२८ लाख रुपये दंड म्हणून वसूल केले.