भुसावळ – येथिल माहेश्वरी भवन,विठ्ठल मंदिर वॉर्ड भुसावळ येथे आयोजित व्यापाऱ्यांना अन्न सुरक्षा व मानदे कायद्याचे मार्गदर्शन शिबीर दि ५ रोजी पार पडले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्यापारी असोसीएशनचे राधेश्याम लाहोटी हे होते.तर मार्गदर्शक म्हणून के एम.साळुंखे व आर.एम.भारकड अन्नसुरक्षा अधिकारी जळगाव,अशोक फालक न पा आरोग्य अधिकारी यांची विशेष उपस्थिती
होती.
केंद्र शासन आदेशानुसार प्रत्येक अन्न व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांसाठी फुड सेफ्टी एन्ड स्टँडर्स् अथोरटी ऑफ इंडिया (FSSAI ) परवाना किंवा नोंदणी घेऊनच व्यवसाय करणे बंधनकारक आहे.प्रत्येक अन्न विक्रेता,धान्य,फळे व भाजी विक्रेते,फास्ट फूड सेंटर,फेरीवाला,गृहोद्योग, दुग्ध व्यवसाय व बर्फाचा कारखाना हे या कायद्याच्या मर्यादेत येतात.या नियमांचे पालन न केल्यास दंड व कारावास होऊ शकतो.या वेळी व्यापारांनी आयोजन केलेल्या कार्यक्रमात के एम.साळुंखे व आर.एम.भारकड अन्नसुरक्षा अधिकारी जळगाव हे व्यापारांशी बोलत असतांना म्हणाले.
या वेळी भुसावळ सह सर्व व्यापारींची उपस्थिती होती.अध्यक्ष राधेश्याम लाहोटी यांनी व्यापाऱ्यांना मार्गदर्शन केले.सेक्रेटरी निर्मल कोठारी,कोषाध्यक्ष राजेश लड्ढा,नरेंद्र अग्रवाल,जयंती सुराणा,श्याम दरगड,प्रसाद पांडे,नीलेश शर्मा,नितीन धांडे, देवा वाणी यांनी परिश्रम घेतले.सुत्र संचलन प्रसाद पांडे तर आभार राधेश्याम लाहोटी यांनी मानले.



