भोळे महाविद्यालयात महात्मा गांधी तसेच शास्त्री जयंती साजरी

भुसावळ- येथील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात आज राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच भारतरत्न लाल बहादुर शास्त्री यांची जयंती संयुक्तपणे राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे साजरी करण्यात आली.
या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ आर पी फालक यांचे हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारतरत्न लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करण्यात आले. त्या नंतर महाविद्यालयाच्या वनस्पती शास्त्र विभागाच्या उद्यानात वैद्यकीय दृष्ट्या आणि शैक्षणिक दृष्ट्या उपयुक्त रोपांचे रोपण करण्यात आले या मध्ये कोरफड, इन्सुलिन, नेचे, अश्वगंधा, शतावरी अश्या झाडांचा समावेश होता.
या नंतर महात्मा गांधी तसेच लाल बहादूर शास्त्री यांच्या जीवनावर आधारीत माहितीवर वेबीनार चे आयोजन केलं होते या वेबिनार कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ आर पी फालक होते तर प्रमुख व्याख्याते म्हणून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव चे माजी भुसावळ विभाग समन्वयक प्रा डॉ एस व्हि बाविस्कर, विद्यापीठाचे माजी जळगाव जिल्हा समन्वयक तसेच माजी विद्यापीठ सल्लागार समिती सदस्य प्रा डॉ दयाघन राणे उपस्थित होते
आपल्या भाषणात प्रा डॉ संजय बाविस्कर यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील प्रयत्नांचा आढावा घेऊन त्यात महात्मा गांधींची भूमिका स्पष्ट केली. महात्मा गांधींचे विविध सत्याग्रह आणि स्वतंत्र प्राप्ती साठी केलेले अहिंसात्मक प्रयत्न यांची माहिती दिली, तर प्रा डॉ दयाघन राणे यांनी महात्मा गांधींचे विचार कशा पद्धतीने सर्वकालीन महत्त्वाचे आहेत हे सांगताना त्यांचे जन्माचे १५० वर्षानंतर त्यांचे व्यक्ती म्हणून कार्याची चर्चा होण्यापेक्षा त्यांच्या विचारांचे अनुकरण आणि अनुसरण होणे महत्त्वाचे आहे म्हणून गांधी विचार अमलात आणताना आपल्या जवळ असणाऱ्या साधन सामुग्री चा वापर करत स्वावलंबन आणि कृतीशीलता या द्वारे आर्थिक प्रगती साधावी ही महात्मा गांधींना खरी आदरांजली असे मत व्यक्त केले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ आर पी फालक यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधीं आणि भारतरत्न लाल बहादूर शास्त्री यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकून त्यांनी देशासाठी केलेलं त्याग आणि समर्पण हे गुण अंगिकारल्यास देश खऱ्या अर्थाने महासत्ता होऊ शकेल असे मत व्यक्त केले
या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना एकक द्वारे करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी प्रा डॉ जी पी वाघुळदे यांनी केले. तर आभार प्रदर्शन महिला कार्यक्रम अधिकारी प्रा निर्मला वानखेडे यांनी केले. या दिवसाच्या तीनही कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. असे महाविद्यालयाच्या प्रसिध्दी समिती तर्फे प्रा डॉ संजय चौधरी यांनी कळवले आहे