भुसावळ : तालुक्यातील फुलगाव, कठोरे बुद्रुक, कठोरे खुर्द आणि अंजनसोंडे या चारही गावांची सामूहिक पाणीपुरवठा योजना जलजीवन मिशनसाठी निवड झाल्याने समाधान व्यक्त होत आहे. या गावांमध्येफुलगाव, कठोरे, अंजनसोंडे गावांची जलजीवन मिशनसाठी निवड – आता प्रत्यक्ष कामाबाबत सर्वेक्षणही सुरू करण्यात आले असून पाणीप्रश्न मिटणार असल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आमदार संजय सावकारे यांच्या प्रयत्नातून या गावांची निवड झाली आहे.

सॅटेलाईट यंत्रणेद्वारे सर्वेक्षण
एमएसव्ही इंटरनॅशनल कंपनी दिल्ली येथील पथकाने प्रत्यक्षात चारही गावांना भेट दिली. तसेच आठ दिवस या गावांमध्येच राहून सॅटेलाइट यंत्रणेद्वारे सर्व्हे करण्यास सुरुवात करण्यात आली. गावातील ओडिएच्या योजनेला 46 वर्षे पूर्ण झाले आहेत. गावातील पाण्याची टाकी, पाईप लाईनही जीर्ण झाली होती. त्यामुळे या यंत्रणेद्वारे पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध होत नसल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत होत्या. या चारही गावांमध्ये यामुळे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली होती. मात्र आता नवीन योजनेचा थेट सर्व्हे सुरू झाल्याने आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सर्वेक्षणप्रसंगी यांची उपस्थिती
सर्वेक्षणाच्या वेळी आमदार सावकारे, प्रोजेक्ट मॅनेजर विपुल पराशर, आर.के. शर्मा व त्यांची सहकारी टिम, अभियंता चव्हाण, माजी सभापती राजेंद्र चौधरी (फुलगाव), सरपंच वैशाली टाकळे, उपसरपंच व भाजप सरचिटणीस राजकुमार चौधरी, कठोरे खुर्दच्या सरपंच रोहिणी पाटील, कठोरा बुद्रूकच्या सरपंच दीपाली मोरे, भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष जितेंद्र कोळी, अंजनसोंडेचे सरपंच पती रामराव पाटील आदी उपस्थित होते


