विजेच्या धक्क्याने ४० वर्षिय शेतकऱ्याचा मृत्यु ; पारोळा तालुक्यातील पोपटनगर येथिल घटना ;


पारोळा-
पारोळा तालुक्यातील पोपटनगर येथिल शेतकरी दयाराम राठोड ( वय ४० )यांचा विजेच्या धक्क्याने मृत्यु झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे .
याळबाबत अधिक माहिती अशी कि तालुक्यातील पोपटनग येथिल शेतकरी दयाराम राठोड हे दि,७ रोजी आपल्या शेतातील पाण्याची मोटार सुरु करण्यासाठी गेले असता त्यांना विजेचा शाॅक लागल्याने त्यांना गावातील पाडुरंग राठोड,कैलास राठोड, राहुल चव्हाण,यांनी खाजगी वाहानाने पारोळा कुटीर रूग्णालय येथे दाखल केले असता डाॅक्टरांनी तपासुन त्यांना मृत्यु घोषित केले या घटनेची माहिती कैलास राठोड यांनी पारोळा पोलिसात दिल्याने अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे, पुढील तपास पारोळा पोलिस करित आहेत,