भुसावळात तापी नगरात तीन दुचाकी अचानक पेटल्या जळाल्या –

भुसावळ :
शहरातील तापी नगरात मंगळवारी रात्री तीन मोटर सायकली पेटल्याची घटना घडली. यात सुमारे 95 हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तिन्ही मोटर सायकली अचानक कश्या पेटल्या याबाबत तर्क वितर्क लढविले जात आहे. कोणी समाजकंटकाने तर या गाड्या पेटविल्या नाही, असाही सूर व्यक्त केला जात अहे.
तापी नगरातील रहिवासी वेदांत किरण जोशी यांनी त्यांच्या दोन व मित्राची एक अश्या तीन मोटर सायकली घराच्या बाहेर लावल्या होत्या. रात्री 12.30 वाजेच्या सुमारास अचानक मोटर सायकलींनी पेट घेतला. यामुळे या परीसरात एकच खळबळ उडाली. एकाच वेळी तिन्ही मोटरसायकली जळाल्याने या मोटरसायकली कोणी जाळल्या का, त्या दिशेने पोलिस तपास करीत अहे.

याप्रकरणी वेदांत किरण जोशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात अकस्मात आगीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तिन्ही मोटर सायकली जळाल्याने 95 हजार रूपयांचे नुकसान झाले.