भुसावळ — हतनुर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सतंतधार पाऊस सुरू असल्याने तापी नदीमध्ये धरणाचे पाण्याचे विसर्ग सोडण्यात येत आहे. त्यामुळे तापी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला आहे. तापी नदी दुथडी भरून वाहत आहे .
तापी नदीला आलेला पूर पाहण्याकरिता निसर्ग प्रेमी व नागरिकांनी तापी नदीच्या पुलावर गर्दी केली असल्याचे दिसून येत आहे .
तापी नदीवर पूर पाहण्याकरिता आले असता सेल्फी काढण्याचा मोह तरुणाई व निसर्ग प्रेमी जनतेला आवरता येत नसल्याचे दिसून येत आहे .

तापी नदी वरील मार्ग मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राला जोडणारा एकमेव मार्ग असल्याने या रस्त्यावर सतत वाहनांची वर्दळ सुरु असते. या ठिकाणी सेल्फी काढताना एखादी अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही .याकरीता नागरिकांना नगरपालिका प्रशासनाच्यावतीने वारंवार गर्दी न करण्याचे आवाहन केले जात आहे.


