भुसावळ (प्रतिनिधी )-
महाराष्ट्र राज्य प्रहार जनशक्ती पक्ष सलंग्नित प्रहार शैक्षणिक व सामाजिक बहुउद्देशिय संघटना तर्फे नामदार राज्यमंत्री बच्चुभाऊ कडु यांचे वाढदिवसा निमित्त ३० जुन ते ५ जुलै हा “समाजहित- समाजभान ” हा सप्ताह साजरा करण्यात येत आहे .
या अनुषंघाने भुसावळ येथे आजपासुन वृक्षारोपण करण्यात येवून सप्ताहास प्रारंभ झाला .
प्रसंगी येथील कॉलनी येथे गुलमोहर काॅलनीत १० फळ झाडे व डेरेदार सावली देणारे वृक्ष काॅलनीतील काही परिवारांने दत्तक घेतले व पालकत्व स्विकारले. कोविड १९ च्या पार्श्वभूमिवर त्रिसूत्री नियमांचे पालन करण्यात आले .
शहरात आज स्वर्गिय मोहन पेहेलवानजी बारसे हनुमान आखाडा टिंम्बर मार्केट, या ठिकाणी सिताफळ, निंब व पिंपळ असे फळझाडे व सावली देणारे मोठे डेरेदार वृक्षांच्या रोपांचे वाटप करून रोपण जितुभाई पवार (जाट) गोसेवा परिवार सदस्य भुसावळ यांचे हस्ते करण्यात आले,
वातावरण शुध्द रहावे, सध्या आॅक्सिजनची उणीव सर्वत्र वाटत आहे . जंगल तोड व वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा समतोल राहीलेला नाहि , याच अनुषंगांने वाढदिवसाला अवाजवी खर्च न करता पर्यावरण वाचवणे, व समाजहित जोपासण्याकरिता विकासदादा घुगे ,कृष्णांतदादा गायकवाड , कृष्णादादा बोदेले ,
यांचे मार्गदर्शनाने उपक्रम राबविण्यात येत आहे, तसेच सामाजहित- समाजभान या सप्ताहातंर्गत रक्त तपासणी , नेत्र तपासणी , गरीब व गरजू यांना अन्नदान , वृक्षारोपण यासह विविध उपक्रम 5 जुलै पर्यंत राबवीन्यात येत असल्याची माहिती महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सौ राजेश्री नेवे यांनी दिली .
यावेळी माया चौधरी,स्मिता माहुरकर, वंदना झांबरे, दिपिका मेश्राम, प्रतिक्षा बर्हाटे,लक्ष्मी तायते, अंकीता ठाकुर, पुजा कापुरे, निकिता सपकाळे, लक्ष्मी तायडे हे उपस्थित होते, गौसेवा परिवार समिती, मनिष मेश्राम, रोहन पाटील, शुभम झांबरे, उमेश नेवे, यांचे अनमोल सहकार्य लाभले



