भुसावळ (प्रतिनिधी )-
संपूर्ण भारतामध्ये विविध ठिकाणी काही धर्मांधानी समाज आणि धर्म कंटक प्रवृत्तींनी, जबरदस्तीने युवती महिलांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांच्याशी विवाह करून त्यांना वाम मार्गाला लावून मग नंतर त्यांची हत्या केल्याच्या दुर्दैवी घटना समोर आल्यात. अशा प्रकारे संपूर्ण भारतात लव जिहाद पसरविण्या पासून अशा धर्मांधाना समाज विघातक प्रवृत्तीना रोखण्यासाठी आपल्या देशातील मध्यप्रदेश सरकार प्रमाणे आता उत्तर प्रदेश गुजरात राज्यात सुद्धा लव जिहाद विरुद्ध कायदा अमलात आणला गेला आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने सुद्धा त्वरित लवजिहाद विरुद्ध चा कायदा त्वरित युद्ध पातळीवर मंजूर करून त्याची अंमलबजावणी महाराष्ट्र राज्यात करावी व या कायद्यात एखाद्याने व्यक्ती ने विवाह करण्याच्या नावाखाली जबरदस्तीने जर एखाद्या महिला युवतीचे धर्मांतर करण्यास तिला भाग पाडले तर अशा व्यक्तीसाठी कमीत कमी 20 वर्षाची सक्तमजुरीची काळ्या पाण्याची शिक्षेची तरतुद या कायद्यात असावी. संबंधित व्यक्तीला देशद्रोही विघातक कार्य करणारा व जातीय तेढ निर्माण करणारा म्हणून घोषित करण्यात याव. जबरदस्तीने धर्म परिवर्तन करून केल्या जाणाऱ्या विवाहांना शून्य समजण्यात यावा, जबरदस्ती ने धर्मांतर करून विवाह करण्यास भाग पडणाऱ्या व्यक्तीला कुठल्याही शासकीय योजनांचा लाभ मिळू नये. शासकीय विवाहनोंदणी कार्यालयाने त्यांच्याकडे धर्मांतर करून विवाह नोंदणीसाठी येणाऱ्या बद्दल त्या कार्याच्या संबंधित कार्य करतील पोलीस स्टेशनला त्वरित माहिती देऊन कळवावे. त्यांचेकडून संबंधितांना अशा विवाहांचा नोंदणीसाठी एनओसी स क्तीची करावी. अशा या विवाह च्या नोंदणी साठी त्यांचे आई वडील पालक साक्षीदार असणे बंधनकारक करावे.या विविध बाबी समाविष्ट करून सक्तीचा लव जिहाद कायदा महाराष्ट्रात लागू व्हावा यासाठी स्वतःजातीने लक्ष घालावे
अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शिशिर दिनकर जावळे यांनी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना याबाबत ई -मेल द्वारे एक पत्र पाठवून केली असल्याचे जावळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.याबाबत जावळे यांनी काही महिन्यापूर्वी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांचे कडे मागणी केली होती. मात्र अद्यापपावेतो महाराष्ट्र सरकारने कुठलिही अनुकूलता व मानसिकता दाखवलेली नसल्याच सुद्धा जावळे यांनी म्हटले आहे.



