भुसावळातील उपद्रवी पालिका निवडणुकीवेळी होणार हद्दपार –

भुसावळ :

सामाजिक शांततेला धोका ठरू पाहणार्‍या उपद्रवींना हद्दपार करण्यासाठी पोलीस प्रशासनाने खाकी वर्दीचा खाकया दाखवण्या करीता नियोजन केले आहे .

आगामी चार महिन्यानंतर पालिकेच्या निवडणुका होवू घातल्या असून या पार्श्‍वभूमीवर शांततेत निवडणुका होण्यासाठी डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी नियोजन केले आहे. शहर, बाजारपेठ व तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील सुमारे शंभर उपद्रवी पोलिसांच्या रडारवर आहेत. शहरात अशांतता निर्माण करणे, शासकीय कामात अडथळा आणणे, दादागिरी, खून, हाफ मर्डर आदी विविध कलमांखाली दाखल असलेल्या गुन्हेगारांची कुंडली काढली जात आहे. आतापर्यंत 51 जणांचे हद्दपारीचे प्रस्ताव तयार झाले असून यातील सुमारे 25 पेक्षा अधिक प्रस्ताव वरीष्ठांकडे रवाना झाले आहेत तर येत्या आठवड्याभरात आणी काही प्रस्ताव वरीष्ठांना सादर केले जाणार आहे. तीनही पोलीस ठाण्याच्या अधिकार्‍यांची उपअधीक्षकांनी या संदर्भात बैठक घेवून त्या संदर्भात प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *