मुंबई व गोरखपूर दरम्यान सुधारित वेळ, ट्रेन क्रमांक व संरचनेसह विशेष दैनिक गाड्या


भुसावळ (प्रतिनिधी )-
खाली दिलेल्या तपशिलानुसार रेल्वेने मुंबई व गोरखपूर दरम्यान विशेष दैनिक गाड्या सुधारित वेळ, रेल्वे क्रमांक व संरचनेसह चालवण्याचे निश्चित केले आहे.यामध्ये
1) ट्रेन क्रमांक 02542/02541 आता 02103/02104 दैनिक सुपरफास्ट विशेष म्हणून चालविण्यात येईल

गाड़ी क्रमांक 02103 डाउन दैनिक विशेष आता 11.04.2021 पासून पुढील सूचना मिळेपर्यंत लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 05.23 वाजता सुटेल आणि गोरखपूरला दुसर्‍या दिवशी 11.45 वाजता पोहोचेल.
डाउन दिशा स्टॉप – भुसावळ-12.05/12.10, खंडवा-14.15/14.20
गाड़ी क्रमांक 02104 अप दैनिक विशेष आता 12.04.2021 पासून पुढील सूचना मिळेपर्यंत गोरखपूर येथून 22.30 वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे तिसर्‍या दिवशी 04.35 वाजता पोहोचेल.
अप दिशा स्टॉप – खंडवा- 19.08/19.10, भुसावळ – 21.05/21.10
थांबे : इटारसी, भोपाळ, झांसी, उरई, पोखरायण, कानपूर सेंट्रल, ऐशबाग, बादशाह नगर, गोंडा, बभ्नान, बस्ती आणि खलीलाबाद
सुधारित संरचना : 1 द्वितीय वातानुकूलित, 4 तृतीय वातानुकूलित, 10 शयनयान, 4 द्वितीय आसन श्रेणी.

2) ट्रेन क्रमांक 01015/01016 आता 02538/02537 दैनिक सुपरफास्ट विशेष म्हणून चालविण्यात येईल

02538 दैनिक विशेष आता 13.04.2021 पासून पुढील सूचना मिळेपर्यंत लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 00.35 वाजता सुटेल आणि गोरखपूरला दुसर्‍या दिवशी 07.05 वाजता पोहोचेल.
02537 दैनिक विशेष आता 11.04.2021 पासून पुढील सूचना मिळेपर्यंत गोरखपूर येथून 17.45 वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे तिसर्‍या दिवशी 00.10 वाजता पोहोचेल.

थांबे : ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, चाळीसगाव, पाचोरा, जळगाव, भुसावळ, रावेर, बुरहानपूर, नेपानगर, खंडवा, खिरकिया, हरदा, तिमानी, इटारसी, होशंगाबाद, मंदीदीप, हबीबगंज, भोपाळ, विदिशा, गंज बसोदा, बीना, ललितपूर, झांसी, उरई, कालपी, कानपूर सेंट्रल, उन्नाव, ऐशबाग, बादशाह नगर, बाराबंकी, गोंडा, माणकापूर, बभ्नान, बस्ती आणि खलीलाबाद
सुधारित संरचना: २ द्वितीय वातानुकूलित, ६ तृतीय वातानुकूलित, ७ शयनयान, ४ द्वितीय आसन श्रेणी आणि एक पेंट्री कार.

टीप :
लोकमान्य टिळक टर्मिनस येथून गाडी क्रमांक 01015 विशेषच्या दि. ९.४.२०२१ व १०.४.२०२१ रोजी ,गाडी क्रमांक 02542 विशेषच्या दि. ९.४.२०२१, १०.४.२०२१ व ११.४.२०२१ रोजी ,
गाडी क्रमांक 05017 विशेषच्या दि ११.०४.२०२१ व १२.०४.२०२१ ला कोणत्याही फे-या नसतील.
विशेष गाड्यांच्या प्रवाशांनी विस्तृत माहितीसाठी www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस अ‍ॅप डाउनलोड करा.
केवळ कंफर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष गाड्यांमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येईल.
प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी सीओव्हीआयडी 19 शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *