कोरोनाचा उद्रेक : पुन्हा 15 जणांचा मृत्यू तर 1142 बाधीत आढळले – जिल्ह्यातील बाधीतांची संख्या पोहोचली 91 हजार 327 वर : एकाच दिवसात 1222 रुग्णांची कोरोनावर मात : 24 तासात 15 रुग्णांचा मृत्यू ;


जळगाव –
जिल्ह्यात शुक्रवारी कोरोनाचे तब्बल 1142 रुग्ण आढळले असून त्याबाबत प्रशासनाला सायंकाळी अहवाल प्राप्त झाला आहे तर आतापर्यंत कोरोनामुळे 1653 रुग्णांचा मृत्यू ओढवला. जिल्ह्यात आतापर्यंत 91 हजार 327 नागरीकांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील 77 हजार 956 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे तर शुक्रवारी एकाच दिवसात 1222 रुग्णांनी कोरोनावर मात केली तर गेल्या 24 तासात 15 रुग्णांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.
गुरूवारी या शहरात आढळले बाधीत संख्या
जळगाव शहर 249
जळगाव ग्रामीण 36
भुसावळ 169
अमळनेर 76
चोपडा 115
पाचोरा 43
भडगाव 37
धरणगाव 43
यावल 66
एरंडोल 54
जामनेर 13
रावेर 27
पारोळा 57
चाळीसगाव 68
मुक्ताईनगर 57
बोदवड 29
अन्य जिल्हा 03
24 तासात 15 रुग्णांचा मृत्यू
गेल्या 24 तासात तब्बल 15 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये-
जळगाव शहरातील 77 पुरूष व 22, 32, 60, 62 व 65 वर्षीय महिलेचा
भुसावळ तालुक्यातील 36, 51 व 68 वर्षीय पुरूष व 45 व 55 वर्षीय महिलेचा
अमळनेर तालुक्यातील 52 व 70 वर्षीय पुरूषाचा तसेच 71 वर्षीय महिलेचा
धरणगाव तालुक्यातील 38 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *