इरीन तर्फे भारतीय रेल्वेच्या विद्युत अभियंत्यासाठी “ऊर्जा व्यवस्थापन “या विषयावर एका आठवड्याचे प्रशिक्षण मॉड्युलची सुरुवात ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
एक नवीन उपक्रम म्हणून, भारतीय रेल्वे विद्युत इंजिनीरिंग संस्था (इरीन), नाशिक ने भारतीय रेल्वेच्या विद्युत अभियंत्यासाठी “ऊर्जा व्यवस्थापन “या विषयावर एका आठवड्याचे प्रशिक्षण मॉड्युल ची सुरुवात केली आहे . दिनांक 22 ते 26 मार्च 2021 या कालावधीत प्रथम असे मॉड्युल इरीन ने आयोजित केले होते . या मॉड्युल मध्ये ब्यूरो ऑफ एनर्जी एफीशियन्सी (बीईई) आणि नॅशनल प्रोडक्टिविटी कौंसिल (एनपीसी) च्या तज्ांची खालील विषयावर व्याख्याने समाविष्ट केली आहेत . उपकरणासाठीचे स्टार रेटिंग चे निकष ,पीएटी (परफॉर्म ,अचिव्ह आणि ट्रेंड )योजना . आयएसओ 50001.,आणि कार्बन अकॉउंटिंग. या व्यतिरिक्त , या प्रक्षिशण मॉड्युलचा एक भाग म्हूणन ऑप्टीमाइझड लाइटिंग सोल्युशनस आणि अर्थिंगविषयी दंतकथा आणि तथ्य ” असे दोन विशेष वेबिनारही आयोजित करण्यात आले होते आणि यामध्ये संपूर्ण भारतीय रेल्वे मधून ६०० हुन अधिक सहभागींनी हजेरी लावली .
आपल्या शेवटच्या भाषणात डॉ अभिताभ ओझा , महासंचालक/इरीन म्हणाले कि हे प्रशिक्षण क्षेत्रीय रेल्वे आणि उत्पादन एककांना त्यांच्या सामान्य सेवा (जीस), कर्षण आणि कर्षण वितरण (टीआरडी ) विभागाच्या त्यांच्या ऊर्जा संवर्धनाच्या प्रयत्नामध्ये मोठ्या प्रमाणात मदत करेल तसेच ब्यूरो ऑफ एनर्जी एफीशियन्सीच्या पीएटी योजनेत समाविष्ट उद्दीष्टे पूर्ण करण्यात मदत करेल .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *