भुसावळ (प्रतिनिधी )-
जळगांव जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्याधिकारी यांच्या आदेशावरून उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या निर्देशाप्रमाणे दिनांक ५ मार्च रोजी शहरात रात्रीच्या संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या सहा हॉटेल्ससह दुकान तसेच विना मास्क , मोटर वाहन नियमांचे उल्लघन, (नाईट कर्फ्युचे) उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
भुसावळ शहरात जिल्ह्याधिकारी यांच्या आदेशांन्वये रात्री दहा ते तीन वाजेपर्यंत नाईट कर्फयु अनुसरुन नाकाबंदी करण्यात आली होती त्याचप्रमाणे नाईट कर्फ्युचे उल्लंघन करणाऱ्या दुकानें तसेच व्यक्ती यांचेवर कारवाई करण्यात आली. यामध्ये मोटार वाहन कायद्यानुसार 40 वाहनांवर कारवाई करण्यात आली.️त्याशिवाय बिना मास्कच्या 25 केसेस करण्यात आल्या. त्यामध्ये प्रत्येकाकडून पाचशे रुपये दंड वसूल करण्यात आला. त्याचप्रमाणे रात्री दहानंतर चालू असणाऱ्या आस्थापनांवर देखील कारवाई करण्यात आलेली आहे.यात 6 दुकाने, हॉटेल्स यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली.तसेच भुसावळ शहर पोलिस स्टेशन हद्दीतील 10 आस्थापनांवर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 33 नुसार कारवाई करण्यात आली.
सदरची कारवाई सोमनाथ वाघचौरे उपविभागीय पोलिस अधिकारी,भुसावळ यांचे निर्देशाप्रमाणे पोलीस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे,शहर पोलीस स्टेशन, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश धुमाळ,सहाय्यक पोलीस निरीक्षक एल.एच.गायकवाड यांचेसह वाहतूक शाखा भुसावळ,बाजारपेठ पोलीस स्टेशन त्याचप्रमाणे भुसावळ शहर पोलिस स्टेशन व भुसावळ शहर वाहतूक शाखा यांच्या स्टाफने केलेली आहे.



