इनरव्हील क्लबतर्फे कट्टा सुशोभीकरणातून पर्यावरण पूरक संदेश –


भुसावळ (प्रतिनिधी )-
भुसावळातील इनरव्हील क्लबतर्फे कट्टा सुशोभीकरणातून पर्यावरण पूरक संदेश देण्यात आला. शहरातील नवशक्ती आर्केड येथील एका झाडाच्या पायथ्याला सुशोभीकरण करून प्रबोधनात्मक संदेश देण्यात आला. उद्घाटन असोसिएशन्स एसएससी डॉ.रश्मी शर्मा यांच्या हस्ते करण्यात आले.
क्लब अध्यक्ष शीतल भराडे म्हणाल्या की, यापुढे देखील अशाच पद्धत्तीने उपक्रम राबवण्यात येणार आहे . उद्घाटन प्रसंगी मनीषा तायडे, रुचिका शर्मा, शशीकला लाहोटी, पद्मजा दरगड उपस्थित होत्या.
महिला दिनाच्या अनुषंगाने रोटरी क्लब भुसावळतर्फे महिला स-शक्तिकरण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. या सप्ताहात दरम्यान पहिल्या दिवशी मोलमजुरी करणार्‍या महिलांचे डोळ्यांची तपासणी करण्यात आली तसेच दुसर्‍या दिवशी सोनोग्राफी करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *