भुसावळात भाजपा महिला मोर्चा तर्फे तहसीलदार यांना निवेदन ; ना . संजय राठोड यांनी राजीनामा द्यावा – मागणी


भुसावळ (प्रतिनिधी )-
पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी राज्याचे वन मंत्री संजय राठोड यांनी राजीनामा द्यावा या मागणी संदर्भात भुसावळ तहसीलदार यांना २७ फेब्रुवारी भाजपा महिला मोर्चा तर्फे निवेदन देण्यात आले.
गेल्या दोन आठवड्यापासून सम्पूर्ण महाराष्ट्रभर चर्चेत असलेल्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात अनेक
गोष्टी समोर आल्या आहेत.
या प्रकरणात राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांची भूमिका संशयास्पद असल्याचे दिसून
येते. तसेच या संदर्भात पुणे येथील वानवडी पोतीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. या संदर्भात
राज्याच्या गृह खात्याकडून निपक्ष चौकशी करण्यात यावी आणि दिवंगत पूजा चव्हाणला न्याय मिळावा. तसेच
नैतिकतेच्या आधारावर संजय राठोड यांनी राजीनामा द्यावा अन्यथा भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा तर्फे आंदोलन करण्यात येईल , असा तीव्र इशाराही यावेळी देण्यात आला .
यावेळी सौ रजनी संजय सावकारे , जिल्हा चिटणीस

  • सौ शैलजा अनिल पाटील ,शहर अध्यक्ष महिला मोर्चा सौ.मीना युवराज लोणारी, नगरसेविका
    सौ.दीपाली परीक्षित बन्हाटे.
    पं स. सभापती सौ. वंदना उन्हाळे
    सौ प्रीती मुरलीधर पाटील-उपसभापती पंचायत समिती सौ मनिषा पाटिल यांचेसह भाजप शहराध्यक्ष परिक्षीत ब-हाटे , सरचिटणीस पवन बुंदेले, अमोल महाजन , रमाशंकर दुबे , कैलास शैलोडे , संदीप सुरवाडे, तालुका अध्यक्ष भालचंद्र पाटील, नंदकिशोर बडगुजर आणि कार्यकर्ते उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *