अट्रावल येथील श्री मुंजोबा महाराज मंदिर आजपासून दर्शनासाठी बंद ;


यावल –
कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर यावल तालुक्यातील अट्रावल येथील श्री मुंजोबा महाराज मंदिर आजपासून दर्शनासाठी बंद करण्यात आले आहे .
येथील अट्रावल येथील श्री मुंजोबा महाराज मंदिर आजपासून दर्शनासाठी बंद करण्यात आले आहे. येथे ’अट्रावलच्या मुंजोबाचे दर्शनासाठी जिल्हयासह राज्यातील विविध भागातुन भाविकांची सोमवार व शनिवार रोजी मोठी गर्दी होत असते.ही यात्रा पौर्णिमेपर्यंत सुरु असते यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तसेही भाविकाच्या दर्शनाच्या सोई करीता मंदिर उघडे होते मात्र
यात्रेस परवानगी नव्हती . कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मुंजोबा मंदिर आज रात्रीपासून दर्शनासाठी बंद करण्यात येत आहे. पुढील निर्देशापर्यंत मंदिर बंदच राहणार असल्याची माहिती मंदिर प्रशासनाने दिली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *