मुक्ताईनगर –
मतदार संघातील बोदवड व मुक्ताईनगर येथील नवनिर्मित नगरपंचायतीद्वारा पूर्णा नदीपात्रातून काल बाह्य पाणीपुरवठा योजनेतून पाणीपुरवठा होत असल्याने या दोघे नगरपंचायतीस 24X7 शिरपूर पॅटर्न धर्तीवर अद्ययावत अशी जलशुद्धीकरण पाणीपुरवठा योजना व भुयारी गटार योजनेच्या कामांना मंजुरी मिळून निधी प्राप्त व्हावा अशा मागणीचे निवेदन आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुंबई येथील मंत्रालयात आज दि.03 फेब्रुवारी बुधवार रोजी राज्याचे नगरविकास मंत्री ना.एकनाथ शिंदे यांना दिले. व यासंदर्भातील महत्वपूर्ण सकारात्मक चर्चा देखील आमदार पाटील यांनी केली.तसेच बोदवड , सावदा व मुक्ताईनगर नगरपंचायत हद्दीतील महत्वपूर्ण विकास कामांसंदर्भात देखील सकारात्मक चर्चा यावेळी करण्यात आलेली आहे .यावेळी शिवसेना शहर संघटक वसंत भलभले , शुभम शर्मा , स्वीय सहायक प्रवीण चौधरी यांची उपस्थिती होती.
याबाबत सविस्तर असे की , मुक्ताईनगर मतदार संघातील बोदवड व मुक्ताईनगर या अनुक्रमे नवनिर्मित नगरपंचायती आहेत .मुक्ताईनगर व बोदवड शहराला होणारा पाणीपुरवठा हा पूर्णा नदीच्या पात्रातून होत असून अतिशय गढूळ व गाळ आणि क्षारयुक्त पाणी शहरात पिण्यासाठी वापरले जाते.तसेच पावसाळ्या आधी सदरील नदीच्या पात्रातील पाणी खाली गेल्याने नदीपात्रात असलेल्या विषारी वनस्पती मुळे होणाऱ्या दूषित पाणीपुरवठयाने दरवर्षी विविध आजारांना लोक बळी पडतात .नगरपंचायत निर्मिती झाले नंतर न पं मुक्ताईनगर तर्फे काही महिन्यापूर्वी पाणीपुरवठ्याची योजना मंजुरीसाठी अंतिम टप्प्यात आहे.परंतु सदरील योजनेस अनेक ठळक त्रुटी असल्याने शहर वासीयांना पुन्हा आहे त्याच धर्तीवर दूषित पाणीपुरवठ्याला सामोरे जावे लागेल.
त्यामुळे प्रस्तावित त्रुटी असलेल्या पाणीपुरावठ्याच्या प्रस्तावा ऐवजी मुक्ताईनगर व बोदवड या दोघे नगरपंचयात हद्दीतील नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा होणेकामी 24X7 शिरपूर पॅटर्न धर्तीवरील अद्ययावत अशी पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात यावी तसेच दोघेही शहराच्या सुंदरतेत व स्वच्छतेत भर पडावी यासाठी भुयारी गटारी प्रकल्पास मंजुरी देण्यात येऊन निधी प्राप्त व्हावा अशी मागणी करण्यात आली आहे .तसेच बोदवड , सावदा व मुक्ताईनगर नगरपंचायत हद्दीतील महत्वपूर्ण विकास कामांसंदर्भात देखील सकारात्मक चर्चा यावेळी करण्यात आलेली आहे .



