मुक्ताईनगरात शिवसेना महिला आघाडीतर्फे निदर्शने -आधार लिंकींग घोळसह पुरवठा विभागाच्या गलभान कारभाराचा केला निषेध ;


मुक्ताईनगर (प्रतिनिधी )-

आधार लिंकच्या घोळासह पुरवठा विभागातील गलथान काराभारामुळे हजारो लाभार्थी धान्यापासून वंचित राहत असल्याने तसेच या अडचणी सोडविण्यास तहसीलदार अपयशी ठरल्याच्या निषेधार्थ शिवसेना महिला आघाडीतर्फे बुधवारी तहसीलबाहेर निदर्शने करण्यात आली.इतर जिल्ह्यात रेशन कार्डचे आधार लिंक झाले असताना येथे मात्र ते होत नसल्याने शिवाय निवेदने देवूनही पुरवठा विभाग कोणतीही कारवाई करीत नसल्याने आंदोलन करण्यात आले.
पुरवठा विभागात नवीन रेशन कार्ड काढताना अनेक अडचणी येत असून आधार सीडिंग तसेच स्वस्त धान्य दुकानावर धान्य कमी मिळणे आदी तक्रारी व निवेदने देवूनही मुक्ताईनगरच्या तहसीलदारांकडून सोडवल्या जात नसल्याने तसेच दिव्यांग व्यक्तींना शासकीय परीपत्रकानुसार स्वतंत्र लाभार्थी कार्ड बनविणे आणि विधवा महिलांचे प्राधान्य कुटुंब रेशन कार्ड बनविणे या प्रमुख मागण्यांसाठी शिवसेना महिला आघाडी तर्फे संविधानिक मार्गाने बुधवारी निदर्शने करण्यात आली.
प्रसंगी महिला आघाडी जिल्हा संघटक कल्पना पालवे, उपजिल्हा संघटक सुषमा शिरसाट, तालुका संघटक शोभा कोळी, शहर संघटक सरीता कोळी, उज्वला सोनवणे, ग्रामपंचायतीच्या माजी सदस्य अनिता मराठे, शारदा भोई यांच्यासह सुनंदा घुले, लता घुले, कल्पना तायडे, नर्मदाबाई गोसावी, भारती जयकर, विमलबाई गायकवाड, सरीता शिंगोटे, सीताबाई माळी, अलका मराठे, संगीता मराठे, यमुना मराठे, सरला माळी, वैशाली दैवे, देवकाबाई मराठे, कस्तुराबाई मराठे, पुष्पाबाई मराठे, अनिता माळी, संगीता खराटे, ललिता खराटे, अनिता बोदडे, राजश्री बोदडे, रेखा खुळे, मंगला धनगर, शोभा गायकवाड, सुनंदा मराठे, कमलबाई मराठे, अनुसयाबाई लोण, शोभा माळी, ज्योत्स्ना माळी, अलका कांडेलकर, भावना गायकवाड, सुरेखा माळी, रेणुका कासार, भिकाबाई दैवे, सुलभा कोळी, ज्योती कोळी, उषा पाटील, नंदा मराठे, कांता इंगळे, आशा इंगळे, सरूबाई सोनवणे, वर्षा पाटील, प्रमिला पवार, आशाबाई ठाकरे, इंदिरा वाघ, रेखा ठाकरे, सुमित्रा इंगळे, चिंधाबाई बोदडे, कल्पना पाटील, कांताबाई सुनील इंगळे, माउराबाई ठाकरे आदी महिला पदाधिकारी तसेच आधार लिंक च्या घोळामुळे त्रस्त झालेले नागरीक व महिला यांचेसह
शिवसेना तालुकाप्रमुख छोटू भोई, उपतालुका प्रमुख प्रफुल्ल पाटील, शहर प्रमुख गणेश टोंगे, विभाग प्रमुख महेंद्र मोंढाळे, युवा सेना तालुकाप्रमुख पंकज राणे, राजेंद्र तळेले, बाळा भालशंकर, प्रकाश गोसावी आदी शिवसेना पदाधिकारी यांचीदेखील उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *