भुसावळात बियाणी गृपचे संस्थापक स्व. बी सी बियाणी मामाजी यांना भावपूर्ण श्रद्धांजली.


भुसावळ (प्रतिनिधी )-
बियाणी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष बी सी बियाणी (मामाजी) यांचा दि. 2 रोजी सातवा स्मृती दिवस होता या प्रसंगी बियाणी परिवारातील सदस्य व स्नेही परिवार तसेच बियाणी ग्रुपच्या विविध शाळांचे प्राचार्य शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यानी आदराांजली भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली


बियाणी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष बी सी बियाणी (मामाजी) यांचा दि. 2 रोजी सातवा स्मृती दिवस होता या प्रसंगी बियाणी परिवारातील सदस्य व स्नेही परिवार तसेच बियाणी ग्रुपच्या विविध शाळांचे प्राचार्य शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यानी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली

यावेळी बीयाणी मिलिटरी स्कूल मधील त्यांच्या पुतळ्यास त्यांच्या पत्नी कांताबाई बियाणी यांनी पुष्पहार अर्पण केला त्यानंतर त्यांचे सुपुत्र मनोज बियाणी,विनोद बियाणी
स्नूषा संगीता बियाणी ,स्मिता बियाणी तसेच त्यांची नातवंडे रोनक बियाणी,मुस्कान बियाणी,पियुष बियाणी,खुशी बियाणी यांनी पुष्पहार अर्पण केले तसेच त्यांचे स्नेही व मित्र परिवारातील सदस्यांनी पुष्पअर्पण केले .
मामाजीनी बियाणी मिलिटरी स्कूलची देखील स्थापना केली होती,बियाणी मिलिटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मामाजींच्या पुतळ्यासमोर मानवंदना दिली व आलेल्या सर्वांनी दोन मिनिटे मौन पालन करीत या महान आत्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.याप्रसंगी आलेल्या सर्वांना त्यांच्या आठवणीने गहिवरुन आले.
यावेळी भुसावळ शहराचे नगराध्यक्ष रमण भोळे, नगरसेवक प्रा.सुनील नेवे, प्रमोद सावकारे,किरण कोलते,पिंटू कोठारी,दीपक धांडे,दिनेश जोगदंड,प्रशांत निकम,पप्पू बारसे,बापू महाजन,दिनेश नेमाडे,देवा वाणी,प्राचार्य मनोज दर्गड, आर पी सिंग,आर आर साहनी,शुक्ला सर,डी एम पाटील,कांचन जोशी,रुद्रसेन गऺठीया, राजू पारीख,प्रवीण भराडिया यांची उपस्थिती होती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *