शस्त्र बाळगल्या प्रकरणी एकास अटक ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
शहरातील नॅशनल हायवे क्रमांक सहा नहाटा चौफुली पुलाच्या खाली घातक शस्त्र (चाकू) बाळगणे बंदी असतांना गणेश कोळी रात्री 11.45 वाजेच्या सुमारास मिळून आल्याने पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला जमा करण्यात आले आहे.

सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी पोकॉ ईश्वर भालेराव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दिनांक 1/2/2021 रोजी नॅशनल हायवे क्रमांक सहा नहाटा चौफुली पुलाच्या खाली सार्वजनिक जागी रात्री 11.45 वाजेच्या सुमारास गणेश दिलीप कोळी वय 21 राहणार जोगलखेडा रोड साकेगाव हा मा.जिल्ह्याधिकारी यांचे आदेश जा/क्र/दंडप्र/कावि- 1/2021-22 दिनांक 21/1/2021 प्रमाणे 22/1/2021अन्वये घातक शस्त्र जवळ बाळगने बंदी असतांना देखील त्यांच्या ताब्यात चाकू मिळून आला म्हणून त्यांचे विरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 चे पोटनियम 1 व 3 चे उल्लंघन 135 गुरुन 007/2021 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुन्ह्याचा पुढील तपास पोहेकॉ जयराम खोडपे करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *