आगामी न.पा. निवडणूक पाहता विरोधकांनी खोटे आरोप करु नये- प्रा डॉ. सुनिल नेवे ;


भुसावळ ( प्रतिनिधी)-
आगामी निवडणुकांवर डोळ्यासमोर ठेऊन जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी विरोधकांकडून पत्रकार परिषदांच्या माध्यमातून सत्ताधार्‍यांवर आरोप करण्यात येत आहे.दुषित पाणी पुरवठ्यात पालिका एक नंबवर असल्याचा दाव्यासह विविध आरोप कृउबा सभापती सचिन चौधरी यांनी केला आहे. या आरोपाला उत्तर देतांना प्रा.डॉ. सुनील नेवे बोलत होते.
प्रसंगी, नगराध्यक्ष रमण भोळे, माजी उपनगराध्यक्ष युवराज लोणारी, शे.शफी अजिज, ऍड बोधराज चौधरी, माजी नगरसेवक निक्की बतरा, भाजपा शहराध्यक्ष दिनेश नेमाडे, पुरुषोत्तम नारखेडेे, माजी नगरसेवक संतोष बारसे, सतीष सपकाळे, देवा वाणी, राजू सूर्यवंशी, नगरसेवक रवींद्र सपकाळे, मुकेश पाटील, अजय नागराणी यांच्यासह नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी, प्रा. डॉ. सुनील नेवे यांनी, चौधरी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्‍नाच्या उत्तरात पालिकेतील विरोधक सत्तेवर असतांना झालेल्या सर्वेक्षणाचा अहवाल भाजपा सत्तेत आल्यावर प्राप्त झाला त्यात शहरातचा अस्वच्छ शहरात समावेश झाला होता. तसेच फेब्रुवारी महिन्यात पाणी पुरवठा करणार्‍या बंधार्‍यातील पाणी साठा आटला होता. यावेळी पालिकेने जिल्हाधिकारी व हतनुर प्रशासनाकडे मागणी केली होती. मात्र पाणी मिळण्यास विलंब होत असल्यामुळे ४४ टक्के दुषित पाणी पुरवठा शहरात झाला होता. तो इतक्या वर्षात फक्त फेब्रुवारीत झाला होता.त्यानंतर ही अशुद्ध पाणी पुरवठा झालेला नाही. मात्र विरोधकांनी तोच धागा घेत सत्ताधार्‍यांवर आरोप केले आहे. याबाबत मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याचे ही चौधरी यांनी सांगितले होते. तर त्यांनी यासाठी सचिन चौधरी यांनी पुढाकार घ्यावाच. कारण, विरोधक पालिकेच्या सत्तेत असतांना सन २०० ते २२ नोव्हेंबर १४ पर्यंत शहरात अशुद्ध पाणी पुरवठा झाला होता. याचे अहवालही उपलब्ध आहे. आगामी न.पा. निवडणूक पाहता विरोधक घाणेरडे राजकारण करत आहे. यामुळे विरोधकांनी खोटे आरोप करु नये. सत्ताधार्‍यांची नगराध्यक्षांवर कुठलीही नाराजी नाही. नगरसेवक एकसंघ असल्याचे प्रा.डॉ. सुनील नेवे यांनी आवर्जुन सांगितले.
नगराध्यक्ष रमण भोळे यांनी, विरोधकांच्या काळातील अहवालामुळेच शहराचा अस्वच्छ शहरात समावेश झाला होता. त्यानंतर वर्षभरातच शहराला फास्टेस्ट ग्रोविंग सीटीचा पुरस्कार शहराला मिळाला आहे. विरोधकांनी १५ वर्षात पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी काहीही प्रयत्न केले नाही. अमृत योजनेची कामे होत आहे. योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होत आहे ही हास्यास्पद बाब आहे.संभ्रम निर्माण करण्यासाठी आरोप होत असल्याचे सांगितले.
माजी उपनगराध्यक्ष युवराज लोणारी यांनी, भाजपा नगरसेवकांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. मात्र भ्रष्टाचाराने बरबटलेल्यांना मतदारांनी घरचा रस्ता दाखविला आहे. त्यांना आमच्यावर आरोप करण्याचा नैतिक अधिकार नाही. भावी नगराध्यक्ष व नगरसेवकांचे स्वप्न पाहणार्‍यांचे स्वप्न स्वप्नच राहतील. पुन्हा भाजपच सत्तेत येणार असा विश्‍वास व्यक्त करुन नगराध्यक्षांवर आमचा विश्‍वास असल्याचे सांगितले.
शहराध्यक्ष दिनेश नेमाडे यांनी, पणी १० एमएलडी प्लँटचे काम होत आहे. जीर्ण झालेल्या प्लँटमधूनही शुद्ध पाणी पुरवठा करण्याचे नियोजन आहे. निकृष्ठतेच्या आरोपाबाबत विरोधकांनीच निष्पक्ष चौकशी करावी. त्यांना आरोप करण्याचा काहीही अधिकार नसल्याचे सांगितले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *