भुसावळ (प्रतिनिधी )-
संपूर्ण जगासह भारतात कोरोना विषाणुने थैमान घातले आहे या विषाणूचा झपाट्याने वाढणारा प्रादुर्भाव रोखण्याकरीता सर्वत्र लॉकडाउन सुरु आहे, यामुळे गोरगरीब मजूर , हातावर पोट भरणाऱ्यां नागरिकांचे हाल अत्यंतदयनीय आहे. अश्या परिस्थितीत शहरासह ग्रामीण भागात गोरगरीब, मोलमजूरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबाचे अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे .म्हणून त्यांच्या मदतीकरीता येथील शिवसेनेच्या रणरागिणी तालुका संघटक सौ भुराबाई चव्हाण यांनी धाव घेतली असून एक हात मदतीचा एक हात कर्तव्याचा देवून शिवसेनेने या गरीबांचे अश्रू पूसून लॉक डाऊन काळात येथील गोरगरीब गरजुंना जीवनावश्यक वस्तु (धान्य किट ) वाटप करण्यात आले आहे .
जिल्हयाचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे मार्गदर्शना खाली शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा आमदार चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून जिल्हा महिला आघाडी संपर्क प्रमुख उषाताई मराठे , तालुकाप्रमुख समाधान महाजन यांच्या सहकार्याने व तालुका संघटक सौ भुराबाई चव्हाण, उज्वला बागुल यांच्या नेतृत्वाखाली जीवनावश्यक वस्तु यात पीठ तांदूळ,साखर,तेल,डाळ आदीं वस्तुंचे सुमारे कुटुंबांना २५ में रोजी काझी प्लॉट, ओंकारेश्वर शिव मंदिर परिसर, नाहाटा बँक परिसर, यासह गडकरी नगर , धम्मनगर ,कुंभार वाडा येथे वाटप करण्यात आले .
येथील किमान शेकडो कुटुंबाना शिवसेनेतर्फे मदत करण्यात आली . या मदतकार्यात महिला आघाडी भुसावळ तालुका संघटक सौ .भुराताई रोहिदास चव्हाण , उज्वला बागुल , शहर संघटिका भारती गोसावी शाखा प्रमुख हिराताई पाटील शाखा प्रमुख अनिता पवार ,उपतालुका प्रमुख रंजना गोसावी ,लक्ष्मी खरे ,पुष्पा खरे, शोभा कानोजे , उपशहर आशा मांडवले, ज्योती मराठे उशाखा प्रमुख सुनंदा वीरगट शाखा प्रमुख , पूजा गिरनारे उपशाखा प्रमुख , सोजा भोई शाखा प्रमुख , सदना तडवी विभाग प्रमुख, अनुरबी शेख विभाग प्रमुख यांचे सहकार्य लाभले .



