खाडे कापून पगार मिळत असल्याने कामगारात नाराजी

नवी मुंबई (प्रतिनिधी )-
 कोरोनाच्या पार्श्वभूमी आपल्या जीवाची पर्वा न करता नवी मुंबई कार्यक्षेत्रात सुविधा देणाऱ्या व समस्या सोडविणाऱ्या पालिका प्रशासनात काम करणाऱ्या करार पध्दतीवरील कामगारांना, ठोक मानधनावरील कामगारांना तसेच पालिका आस्थापनेवरील कामगारांना, घनकचरा विभागातील कामगारांना तसेच  अत्यावश्यक सेवेतील कामगारांना नवी मुंबई इंटकच्या पाठपुराव्यामुळे अखेर पालिका प्रशासनाला दैनंदिन भत्ता ३०० रूपये जाहिर करावा लागला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कामगारांना दैनंदिन भत्ता मिळावा म्हणून मुंबई इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्याकडे लेखी निवेदनातून, प्रत्यक्ष भेटीतून सतत पाठपुरावा  केला होता. मात्र साफ सफाई ठेकेदराने कामगारांना  खाडे कापून पगार देण्यात आल्याचे समजते 
सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशाच्या कानाकोपऱ्यात प्रशासकीय पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. आरोग्य विभाग रूग्णालयात तर पोलिस रस्त्यावर कार्यरत आहे. या पार्श्वभूमीवर नवी मुंबई पालिका प्रशंसनीय काम करत आहे. सध्या रेल्वे बंद आहेत. बससेवा विलंबाने सुरू आहेत. कामगारांना रिक्षाने ये-जा करावी लागत आहे. वास्तविक ही सुविधा प्रशासनाने पुरविणे आवश्यक असताना कामगारांवर पदरमोड करण्याची वेळ आली आहे. जेवण व अन्य सुविधाही विकत घेण्याची वेळ कामगारांवर आली आहे. अश्या ही परिस्थिती कामगार जीव धोक्यात घालून नागरी सुविधा देण्याचे व नागरी समस्या सोडविण्याचे काम करत आहेत.  ते आपल्या घरादाराचा व मुलाबाळांचा विचारही न करता आपणास सेवा देत आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने कोरोनाच्या काळात प्रशासकीय सेवा देणाऱ्या ठोक मानधनावरील तसेच कंत्राटी आणि महापालिका आस्थापनेवरील कामगारांना दैनंदिन भत्ता देणे आवश्यक आहे. मुंबई महापालिकेने ३०० रूपये दैनंदिन भत्ता लागू केला आहे. नवी मुंबई महापालिकेनेही लवकरात लवकर यावर निर्णय घेण्याची मागणी रवींद्र सावंत यांनी सातत्याने पालिका आयुक्तांकडे केली होती. 
नवी मुंबई इंटकच्या पाठपुराव्याला  सकारात्मक प्रतिसाद देताना महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी संबंधित कामगारांना ३०० रूपये दैनंदिन भत्ता लागू केला आहे. कामगारांनी आयुक्तांच्या या निर्णयाबद्दल महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ व कामगार  नेते रवींद्र सावंत यांचे आभार मानले  आहेत. मात्र दुसरी कडे वाशी, नेरुळ, बेलापूर व जुने अग्निशमन केंद्रात साफ सफाई करणाऱ्या कामगारांना खाडे कापून पगार देण्यात येत असल्याचे समजते. या बाबत घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त तुषार पवार यांच्याशी सपंर्क साधला असता चौकशी करतो तर सद्गुरु नामक ठेकेदार यांच्याशी सुद्धा सपंर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *