१५ एप्रिलनंतर धावणार्‍या रेल्वे गाड्यांचे आरक्षण सुरू होण्याचे संकेत ; गीतांजली एक्स्प्रेस, महानगरी, विदर्भ, अमरावती-मुंबई एक्स्प्रेस, मंडुआडीह, भागलपूर, ताप्ती गंगा, नवजीवन एक्स्प्रेस, ज्ञानगंगा, महाराष्ट्र एक्स्प्रेसचे आरक्षण सुरु

भुसावळ (प्रतिनिधी )
देशभरात लॉकडाऊन झाल्यामुळे रेल्वेसेवा बंद करण्यात असली तरी 14 एप्रिल रोजी रात्री 12 नंतर प्रस्थान करणार्‍या रेल्वे गाड्यांची आरक्षण प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. गीतांजली एक्स्प्रेस, महानगरी, विदर्भ, अमरावती-मुंबई एक्स्प्रेस, मंडुआडीह, भागलपूर, ताप्ती गंगा, नवजीवन एक्स्प्रेस, ज्ञानगंगा, महाराष्ट्र एक्स्प्रेस या गाड्यांचे आरक्षण ऑनलाइन सुरू झाले आहे. त्यामुळे प्रवासी या गाड्यांचे आरक्षण करत आहे मात्र लॉकडाऊन वाढल्यास या गाड्या पुन्हा रद्द होऊ शकण्याची शक्यता आहे. या गाड्या रद्द झाल्यास तिकीट आरक्षणाचा परतावा संबंधित प्रवाशांना बँक खात्याद्वारे दिला जाणार आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाच्या सूत्रांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *