भुसावळ (प्रतिनिधी )-
अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संसदेचे चौथे आंबेडकरी विचारवेध संमेलन आता भुसावळ शहरात संपन्न होणार असून त्यात विविध सत्रांमधून आंबेडकरी विचारांचा जागर होणार असल्याची माहिती संयोजन समितीच्या वतीने अ. फ. भालेराव यांनी दिली.
येथील आंबेडकरी साहित्यिक आणि कार्यकर्त्यांच्यावतीने हे संमेलन घेण्यात येणार आहे. याबाबत एक महत्त्वाची बैठक संसदेचे खानदेश समन्वयक ज्येष्ठ गझलकार रमेश सरकाटे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी साहित्य संसदेचे अध्यक्ष प्रशांत वंजारे,ग सरचिटणीस गंगाधर ढवळे, अ. फ. भालेराव, ज्येष्ठ साहित्यिक दिलीप सुरवाडे, जयसिंग वाघ, रविंद्र निकम, प्रा. संदानशिव एम. आर., प्रा. सुभाष झनके, अॅड. मधुकर सपकाळे यांची उपस्थिती होती. बैठकीत संमेलनाबाबत सर्व विषय समित्या आणि विविध मुद्यांबाबत तपशीलवार चर्चा करण्यात आली
यापूर्वी अखिल भारतीय साहित्य संसदेचे नांदेड, औंढा (जि. हिंगोली), पुसद (जि. यवतमाळ) येथे तीन संमेलने यशस्वीरीत्या संपन्न झाली आहेत. शहरात होऊ घातलेल्या चौथ्या आंबेडकरी विचारवेध संमेलानासाठी डॉ. राजेश मानवतकर, अॅड.राजेश झाल्टे, भीमशाहीर प्रतापसिंह बोदडे, पी. बी. शेंडुकार, प्रा. भगवान ननावरे, वसंत सपकाळे, भगवान भटकर, रमेश मकासरे,डॉ. के. के. अहिरे, डॉ. मिलिंद बागुल, संजिवकुमार सोनवणे, डी. एस घोडेस्वार अॅड. सुनील पगारे, अॅड. मतीन अहमद, एस. एस. शेगांवकर, डॉ. अशोक कोळी, अशोक कोतवाल, पुष्पा सावळे, सुषमा तायडे, छाया सोनवणे, प्रा. संबोधी देशपांडे, प्रा. डॉ. वासुदेव वले, इंदिरा जाधव, सदानंद सपकाळे आदी पुढाकार घेत आहेत.



