भुसावळ (प्रतिनिधी )-
येथील भुसावळ कला,विज्ञान व पु.ओं.नाहाटा वाणिज्य महाविद्यालय भुसावळ मधील मानव्यविद्या शाखा अंतर्गत लिंगभाव समानता याविषयावर आधारित व्याख्यानमालेच आयोजन करण्यात आलेले आहे.त्यातील पाहिले व्याख्यान तृतीयपंथी चळवळीतील समाजसेवक श्री.शमीभा पाटील यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले.त्यांच्या व्याख्यानाचा विषय’मराठी साहित्यातील लिंगभाव समानता’हा होता.कार्यक्रमाची सुरुवात वृक्षपूजन करून करण्यात आली.व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य डॉ.ए. डी. गोस्वामी,श्री शमीभा पाटील,सी.डी. सी.चे सदस्य डॉ.जे.एफ.पाटील,डॉ.रेखा गाजरे, डॉ.प्रफुल्ल इंगोले इ मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रस्ताविकेत प्रा.प्रफुल्ल इंगोले यांनी मानव्यविद्या शाखेअंतर्गत घेण्यात येणाऱ्या लिंगभाव समानता सप्ताहाची रुपरेषा मांडली. प्रमुख वक्ते शमीभा पाटील म्हणाल्या की,साहित्य हे जिवंत माणसाला अनुभवातून भावना व्यक्त करण्यासाठी प्रेरित करीत असते.एकसमान मूल्य असणारी समाजव्यवस्था निर्माण करायची गरज आहे.त्यासाठी वास्तवदर्शी साहित्य लिहिले गेले पाहिजे.सध्या आपण क्रांतीच्या मध्यभागी जन्माला आलेले अभागी आहोत.लिंग विषमतेची पाळेमुळे नष्ट केल्याशिवाय सुजाण नागरिक घडू शकणार नाही.सातवाहन काळातील गाथासप्तशती या ग्रंथात लिंगभाव समानता दिसून येते.१९७२नंतरच्या मराठी साहित्यात लिंगभाव मोठ्या प्रमाणात जाणवू लागला.सिमोन बोव्हा यांच्या सेकंड सेक्स नावाच्या ग्रंथामूळे लिंगभाव विचार जगात मोठया प्रमाणात रुजू झाला.मराठी साहित्यात महानुभाव साहित्यिक महादसा यांच्या धवळ्यातून लिंग समानता दिसून आली.आजच्या काळातील रंगनाथ पठारे यांची सातपाटील कुलवृत्तांत या कादंबरीत लिंगभाव दिसून येतो. अध्यक्षीय भाषणात उपप्राचार्य डॉ.गोस्वामी म्हणाले की, मानव्यविद्या शाखेअंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालय सर्वोतोपरी प्रयत्न केले जातात. अशाच प्रयत्नातून या सप्ताहाचे आयोजन करण्यात आलेले आहे.आजच्या व्याखानातुन लिंगभाव समानता ही विद्यार्थ्यांनी अंगिकरावी.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.पुरुषोत्तम महाजन यांनी तर आभार प्रा.उज्ज्वला महाजन यांनी केले. कार्यक्रमाला जेष्ठ नागरिक संघातील सदस्य उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ.पी.ए. अहिरे,प्रा.आशिष नवघरे,प्रा.प्रशांत पाटील,प्रा.दीपक शिरसाट,डॉ.सचिन राजपूत,प्रा.दिनानाथ पाठक,प्रा.निखिल तायडे,डॉ.रुपाली चौधरी,प्रा.भारती सोनवणे,डॉ.स्वाती महाजन इ प्राध्यापकांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.



